गणपतीसाठी धावणार मुंबई ते कुडाळ विशेष रेल्वे, गर्दीवर अनारक्षित गाडीचा उतारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 13:18 IST2024-09-04T13:18:26+5:302024-09-04T13:18:45+5:30
Goanesh Mahotsav: गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वे गाड्यांसाठी गर्दी होत आहे. प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

गणपतीसाठी धावणार मुंबई ते कुडाळ विशेष रेल्वे, गर्दीवर अनारक्षित गाडीचा उतारा
नवी मुंबई - गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वे गाड्यांसाठी गर्दी होत आहे.
प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई ते कुडाळदरम्यान धावणार आहेत. गणेशोत्सवासाठीकोकण रेल्वेने याआधीच विविध मार्गांवर विशेष गाड्या सोडल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या तोंडावर या सर्व गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात गावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
अनारक्षित गाड्या
मुंबई सीएसएमटी-कुडाळ (०११०३) ही स्पेशल अनारक्षित गाडी ४ आणि ६ सप्टेंबर रोजी सोडली जाणार आहे. ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून दुपारी ३:३०ला सुटेल. कुडाळ ते मुंबई सीएसएमटी ही विशेष अनारक्षित गाडी ५ आणि ९ सप्टेंबरला पहाटे ४:३०ला कुडाळ स्थानकावरून सुटेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांवर थांबेल.