मुंबईतही मुलीच ठरल्या सरस

By admin | Published: May 26, 2016 03:25 AM2016-05-26T03:25:43+5:302016-05-26T03:25:43+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत राज्याप्रमाणेच मुंबई विभागीय मंडळातही मुलींचा दबदबा दिसून आला.

In Mumbai too, the girl got the mustard | मुंबईतही मुलीच ठरल्या सरस

मुंबईतही मुलीच ठरल्या सरस

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत राज्याप्रमाणेच मुंबई विभागीय मंडळातही मुलींचा दबदबा दिसून आला. दुसरीकडे मुंबई विभागीय मंडळाच्या एकूण निकालात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. बुधवारी निकाल जाहीर झाला असून निकालाची मूळ प्रत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात ३ जून रोजी मिळणार आहे.
मुंबई विभागीय मंडळातून परीक्षेस बसलेल्या १ लाख ५७ हजार ५६१ मुलांपैकी १ लाख ३० हजार ९१ मुले उत्तीर्ण झाली आहेत, तर १ लाख ४१ हजार ९८० मुलींपैकी १ लाख २७ हजार ७५८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांची टक्केवारी पाहिल्यास ८२.५७ टक्के मुले आणि ८९.९८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी मुंबई विभागाचा निकाल ९०.११ टक्के इतका लागला होता. याउलट यंदा एकूण निकालाची टक्केवारी ८६.०८ इतकीच आहे. (प्रतिनिधी)

निकालाचे
टेन्शन खल्लास!
मंगळवार रात्रीपासूनच विद्यार्थ्यांनी सोशल नेटवर्किंग साइट्सवर स्टेटस बदलले. बहुतेक विद्यार्थी तर बुधवारी सकाळपासूनच काउंट डाऊनच्या रूपात स्टेट्स अपडेट करत होते. बहुतेक विद्यार्थ्यांनी मोबाइलवरूनच निकाल पाहणे पसंत केले. काही मिनिटांतच कॉलेज आणि क्लासेसच्या ग्रुपवर प्रत्येकाचे गुण दिसू लागले. अभिनंदनाचा वर्षाव आणि पार्टीचे बेत चर्चेला आले होते. एकीकडे महाविद्यालयाबाहेर पेढे वाटले जात होते, तर दुसरीकडे काही खासगी क्लासेसनी डीजेच्या तालावर विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा केला.

मुंबई विभागीय मंडळाचा निकाल
विज्ञान
नोंदणी झालेले - ८१ हजार ११४
परीक्षेस प्रविष्ट - ८१ हजार ०२६
उत्तीर्ण विद्यार्थी - ७० हजार ८२५
टक्केवारी - ८७.४१

कला
नोंदणी झालेले - ४७ हजार ६९२
परीक्षेस प्रविष्ट - ४७ हजार ६१३
उत्तीर्ण विद्यार्थी - ३७ हजार ३७८
टक्केवारी - ७८.५०

वाणिज्य
नोंदणी झालेले - १ लाख ६५ हजार ९९४
परीक्षेस प्रविष्ट - १ लाख ६५ हजार ८३८
उत्तीर्ण विद्यार्थी -१ लाख ४५ हजार १६७
टक्केवारी - ८७.५४

उच्च माध्यमिक व्यावसायिक
नोंदणी झालेले - ५ हजार ०६९
परीक्षेस प्रविष्ट - ५ हजार ०६४
उत्तीर्ण विद्यार्थी - ४ हजार ४७९
टक्केवारी - ८८.४५

मिशन अ‍ॅडमिशन
दुपारी पार्ट्यांचे बेत आखणारे काही विद्यार्थी सायंकाळी कॉलेजच्या कट्ट्यावर अ‍ॅडमिशनच्या तयारीला लागले होते. टक्के पाहून नेमके काय करता येईल, याची चर्चाही कॉलेज कट्ट्यावर रंगली होती.

रुईयातून पहिली आल्याचा खूप आनंद होत आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीचे चीज झाले आहे. या यशाचे सारे श्रेय माझ्या शिक्षकांना जाते. त्यांच्या उत्तम शिकवणीमुळे मी आज परीक्षेत यश मिळवू शकले. बारावीनंतर इंजिनीअरिंग किंवा बीएस्सी करून विशेष अभ्यासक्रम निवडण्याकडे माझा कल असेल. पण आज निकालाने एकदम खूश आहे.
- मुग्धा भागवत, (९५.२३% व्होकेशनल-कॉम्प्युटर, विज्ञान शाखा, रुईया महाविद्यालय)

महाविद्यालयात कला शाखेतून पहिला आल्यावर प्रथम विश्वासच बसला नाही. वर्षभर मेहनत केली होती. पण त्याचे इतके गोड फळ निकालाच्या स्वरूपात मिळेल, असे वाटले नव्हते. खूप आनंद झाला आहे. मला अ‍ॅनिमेशन, कार्टून यात रस आहे. त्यातच करिअर करायचे ठरवले आहे.
-निखिल भालेराव (७३.८५% कला शाखा-अंध, रुईया महाविद्यालय)

निकाल लागला तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला. रुईया महाविद्यालयातून पहिले येणे हे माझे स्वप्न होते आणि ते आज पूर्ण झाले. माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय मी आई-वडिलांना देते. त्यांनी सुरुवातीपासूनच माझ्यावर खूप विश्वास ठेवला. माझ्या यशात शिक्षकांचादेखील मोलाचा वाटा आहे. आता मी ‘लॉ-सीईटी’ परीक्षा देण्यासाठी अभ्यास करत आहे.
-सिद्धी भांडेकर (९१.२३% कला शाखा, रुईया महाविद्यालय)

महाविद्यालयातून पहिले आले या बातमीने निकालाचा आनंद द्विगुणित झाला आहे. मला बऱ्याच गोष्टींची आवड आहे. त्यामुळे कशात करिअर करायचे हे अजून तरी ठरवले नाही. पण मला माणसांना जाणून घ्यायला आवडते. त्यामुळे मला मानसशास्त्र विषयात पुढे करिअर करण्याची इच्छा आहे.
- नग्मा शेख (९०% वाणिज्य, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय)

पहिल्या सेमिस्टरला खूप कमी गुण मिळाले होते. त्यानंतर स्वत:ला अभ्यासात झोकून दिले. त्याचे फळ मिळाले, याचा आनंद होत आहे. बारावीनंतर बी.एम.एम.मध्ये प्रवेश घेणार आहे.
- सयोनी घई (८९.७९% कला, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय)

९५% टक्क्यांची अपेक्षा होती. मात्र काही गुणांनी तो आकडा गाठता आला नाही. परिणामी निकालामुळे थोडी निराश झाले. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कोणतीही शिकवणी न घेता मला सगळ्याच विषयात ९० हून अधिक गुण मिळाले आहेत. याचा आनंद आहे. मी सीईटीची परीक्षा दिली आहे. मला १९० पर्यंत गुण मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यानुसार मी मेडिकलमध्ये करिअर करू इच्छिते.
- अजिता नायक (९४.६०% विज्ञान, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय)

Web Title: In Mumbai too, the girl got the mustard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.