अवयवदानात राज्यात मुंबई अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:36 AM2020-01-01T05:36:33+5:302020-01-01T05:37:40+5:30

पुणे दुसऱ्या स्थानी, औरंगाबादमध्ये केवळ तिघांनीच केले अवयवांचे दान

Mumbai is the top state in the state | अवयवदानात राज्यात मुंबई अव्वल

अवयवदानात राज्यात मुंबई अव्वल

googlenewsNext

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये अवयवदानाविषयी जनजागृती वाढल्याने अवयवदानाची टक्केवारी वाढताना दिसत आहे. अवयव प्रत्यारोपणात देश दुसºया स्थानावर आहे. मात्र, तरी अवयवदानाची गरज आणि प्रत्यक्षात होणारे प्रत्यारोपण यात तफावत आहे. देशात दर दशलक्ष लोकसंख्येच्या केवळ ०.६५ टक्के अवयवदानाचे प्रमाण आहे. राज्याचा विचार केला असता, अवयवदानात मुंबईने अव्वल स्थान मिळविले आहे.

यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यात मुंबईत सर्वाधिक म्हणजेच ७९ इतके अवयवदान झाले. त्यानंतर पुण्यात ६३, नागपूरमध्ये १८, औरंगाबादमध्ये केवळ तीन अवयवदानाची नोंद आहे. मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. एस.के.माथूर यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत अवयवदानाचा आकडा वाढला. यंदा ७९ अवयवदान पार पडले आहे. दाते, समन्वयक, डॉक्टर, रुग्ण या सर्व घटकांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले आहे.

नागपूरमध्ये पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
पुण्यात गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षीदेखील ६३ अवयवदानाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. नागपूरमध्येही अवयवदानाची संख्या बदललेली नाही. २०१३ पासून नागपूरमध्ये अवयवदान प्रक्रियेस आरंभ झाला. यंदा पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. औरंगाबादमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत अवयवदानाच्या आकड्यात घसरण होताना पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी औरंगाबादमध्ये ७ अवयवदान झाले होते. मात्र, या वर्षी केवळ ३ अवयवदानाच्या नोंदी झालेल्या पाहायला मिळाल्या, असे मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. एस.के.माथूर यांनी सांगितले.

Web Title: Mumbai is the top state in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.