डासांपासूनच्या आजारांत मुंबई टॉपवर; आरोग्य विभागाची माहिती; मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 07:35 AM2023-08-01T07:35:49+5:302023-08-01T07:36:28+5:30

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रक कार्यक्रमांतर्गत राज्यातील मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया या तीन आजारांच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यामध्ये ही माहिती मिळाली आहे. 

Mumbai tops in mosquito-borne diseases; Information from the Department of Health; Most cases of malaria and dengue | डासांपासूनच्या आजारांत मुंबई टॉपवर; आरोग्य विभागाची माहिती; मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण

डासांपासूनच्या आजारांत मुंबई टॉपवर; आरोग्य विभागाची माहिती; मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण

googlenewsNext

मुंबई : मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण गडचिरोली आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने गेल्या वर्षभारातील कीटकजन्य आजाराची माहिती दिली. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रक कार्यक्रमांतर्गत राज्यातील मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया या तीन आजारांच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यामध्ये ही माहिती मिळाली आहे. 

राज्याचा आरोग्य विभाग गेल्या काही दिवसांमध्ये वाढत असलेल्या कीटकजन्य रुग्णांची वाढती संख्या  लक्षात घेत आहे व ज्या ठिकाणी ही संख्या अधिक आहे तेथे लक्षही केंद्रित करीत आहे. त्यादृष्टीने राज्यातील मलेरिया प्रतिबंधासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गावांमध्ये सिंथेटिक प्रायरेथ्राईड गटातील कीटकनाशकाची  फवारणी करण्यात येत आहे. 

डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी घरातील व परिसरातील डास अळ्या आढळून आलेले पाण्याच्या साठ्यांमध्ये अळीनाशक टेमिफॉस वापरले जाते. कायमी पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडले जातात. मुंबईसह पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले आहेत.    

Web Title: Mumbai tops in mosquito-borne diseases; Information from the Department of Health; Most cases of malaria and dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.