Join us

जागतिक पर्यटनात मुंबई सहाव्या क्रमांकावर!

By admin | Published: November 01, 2015 2:30 AM

जागतिक पातळीवर पर्यटनात आघाडीवर असणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. ‘लोन्ली प्लॅनेट’च्या ‘बेस्ट इन ट्रॅव्हल्स : २०१६’ या पुस्तकाच्या अहवालानुसार

मुंबई : जागतिक पातळीवर पर्यटनात आघाडीवर असणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. ‘लोन्ली प्लॅनेट’च्या ‘बेस्ट इन ट्रॅव्हल्स : २०१६’ या पुस्तकाच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर मुंबई शहर पर्यटनात सहाव्या क्रमांकावर असल्याची नोंद आहे.तसेच पर्यटनात मुंबईने अमेरिका, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियासारख्या देशांनाही मागे टाकले आहे. विशेषत: पर्यटन क्षेत्रावर प्रकाशझोत टाकण्यासाठी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यात जगातील पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्तम शहरांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला आहे. याकरिता खाद्यसंस्कृती, पर्यटन संस्कृती आणि गुंतवणूक अशा काही घटकांचा विचार प्रामुख्याने करण्यात आला आहे.मुंबईची होणारी आर्थिक प्रगती, वेगाने बदलणारे स्वरूप, मोनो-मेट्रो सेवा, मोठाल्या इमारती, शॉपिंग मॉल्स यामुळे मुंबईकडे अधिकाधिक पर्यटकांचा ओढा वाढतोय, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. यात गेट वे आॅफ इंडिया, फोर्ट, कुलाबा, तसेच नवी मुंबईत पर्यटक फिरण्यासाठी अधिकाधिक पसंती देतात असे आढळले आहे. (प्रतिनिधी)