Mumbai traffic advisory: मुंबईच्या बीकेसीमध्ये आज वाहतुकीत मोठे बदल, हायकोर्टाच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 03:01 PM2024-09-23T15:01:51+5:302024-09-23T15:03:48+5:30

Mumbai traffic advisory: बीकेसी येथील वाहतुकीत आज सात तासांसाठी मोठे बदल करण्यात आले आहे. तसे परिपत्रक मुंबई वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आले आहे. 

Mumbai traffic advisory Bombay High Court Ceremony on September 23 check routes to avoid and take here | Mumbai traffic advisory: मुंबईच्या बीकेसीमध्ये आज वाहतुकीत मोठे बदल, हायकोर्टाच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम

Mumbai traffic advisory: मुंबईच्या बीकेसीमध्ये आज वाहतुकीत मोठे बदल, हायकोर्टाच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम

मुंबई

Mumbai traffic advisory: वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमधील जमिनीवर उच्च न्यायालयाच्या नव्या नियोजित संकुलाची आज पायाभरणी होणार आहे. यासाठी सरन्यायाधीश न्या. डॉ. धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी बीकेसी येथील वाहतुकीत आज सात तासांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. तसे परिपत्रक मुंबई वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आले आहे. 

वांद्रे- बीकेसी येथे दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत काही रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. न्यू इंग्लिश स्कूल रोड, रामकृष्ण परमहंस मार्ग आणि जेएल शिर्सेकर मार्गाच्या दोन्ही बाजू वाहतुकीसाठी बंद राहतील. केवळ नियोजित कार्यक्रमाशी निगडीत वाहनांनाच या मार्गावरुन प्रवास करता येईल. सर्वसामान्य वाहतुकीसाठी महात्मा गांधी विद्यामंदिर मार्गाचा वापर करता येणार आहे.

कोण-कोणते रस्ते राहणार बंद
१. न्यू इंग्लिश स्कूल रोड, वांद्रे
२. रामकृष्ण परमहंस मार्ग
३. जेएल शिर्सेकर मार्ग

पर्यायी मार्ग- महात्मा गांधी विद्यामंदीर मार्ग

"सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच इतर अतिमहत्वाच्या व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने रस्ते वाहतूक विभागाकडून काही रस्ते नो एन्ट्री झोन म्हणून निर्धारित करण्यात आले आहेत. या रस्त्यांना पर्यायी मार्ग देखील देण्यात आले आहेत जेणेकरुन वाहतूक सुरळीत राहील"
- समाधान पवार, डीसीपी (मध्य विभाग)

Read in English

Web Title: Mumbai traffic advisory Bombay High Court Ceremony on September 23 check routes to avoid and take here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.