Mumbai traffic advisory: वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमधील जमिनीवर उच्च न्यायालयाच्या नव्या नियोजित संकुलाची आज पायाभरणी होणार आहे. यासाठी सरन्यायाधीश न्या. डॉ. धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी बीकेसी येथील वाहतुकीत आज सात तासांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. तसे परिपत्रक मुंबई वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आले आहे.
वांद्रे- बीकेसी येथे दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत काही रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. न्यू इंग्लिश स्कूल रोड, रामकृष्ण परमहंस मार्ग आणि जेएल शिर्सेकर मार्गाच्या दोन्ही बाजू वाहतुकीसाठी बंद राहतील. केवळ नियोजित कार्यक्रमाशी निगडीत वाहनांनाच या मार्गावरुन प्रवास करता येईल. सर्वसामान्य वाहतुकीसाठी महात्मा गांधी विद्यामंदिर मार्गाचा वापर करता येणार आहे.कोण-कोणते रस्ते राहणार बंद१. न्यू इंग्लिश स्कूल रोड, वांद्रे२. रामकृष्ण परमहंस मार्ग३. जेएल शिर्सेकर मार्गपर्यायी मार्ग- महात्मा गांधी विद्यामंदीर मार्ग
"सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच इतर अतिमहत्वाच्या व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने रस्ते वाहतूक विभागाकडून काही रस्ते नो एन्ट्री झोन म्हणून निर्धारित करण्यात आले आहेत. या रस्त्यांना पर्यायी मार्ग देखील देण्यात आले आहेत जेणेकरुन वाहतूक सुरळीत राहील"- समाधान पवार, डीसीपी (मध्य विभाग)