मुंबईत वाहतूक पोलिसानेच मोडले नियम, उड्डाणपुलावर चुकीच्या दिशेने ड्रायव्हिंग; व्हिडिओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 13:11 IST2024-03-04T13:10:28+5:302024-03-04T13:11:55+5:30
सोशल मीडियावर दिवसेंदिवस नानाविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जगाच्या पाठीवर कुठे काय चालले आहे याची माहिती असे व्हिडीओ पाहून क्षणार्धात मिळते.

मुंबईत वाहतूक पोलिसानेच मोडले नियम, उड्डाणपुलावर चुकीच्या दिशेने ड्रायव्हिंग; व्हिडिओ व्हायरल!
Mumbai Viral Video : सोशल मीडियावर मुंबईतील वाहतूक पोलिसाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी मुंबई शहरातील वाहतूक यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.
शहरातील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर असते. वाहतूक सुरळीत चालावी आणि वाहनचालकांना शिस्त असावी यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्नशील असतात. वाढते अपघात रोखण्यासाठी तसेच बेजबाबदार वाहनचालकांना अद्दल घडवण्यासाठी वाहतूक पोलीस कारवाईचा बडगा उगारतात. पण वाहतूक पोलिसानेच नियमाचे उल्लंघन केले तर?
A citizen caught two instances on his dashcam yesterday - one traffic cop entering the wrong side directly, and the other taking a U-turn before joining the same. We respect the role of police as guardians of Law & Order, but let's uphold the law for everyone's safety & ensure… pic.twitter.com/EukBN3lF0t
— M.N.C.D.F (@MNCDFbombay) March 3, 2024
याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबईतील वांद्रे येथे एक ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल नियम मोडून चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत आहे. वाहतूक पोलीस हवालदार मुंबईत भर दिवसा वांद्रे-वरळी सी लिंकवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसतोय. ही घटना एका कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांतील एक हवालदार वांद्रे येथील उड्डाणपुलावरून चुकीच्या दिशेने जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक्सवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.