मुंबई : लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी तसेच नवे टाकण्यासाठी व इतर कामासाठी वीकेण्डच्या दिवशी 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येईल. कामासाठी 40 टन वजनी दोन क्रेन कार्यरत असतील. लोअर परेल ते चर्चगेट 200 फेऱ्या रद्द होतील.
लोअर परळ स्थानकाजवळील 90 बाय 53 मीटरचा हा पूल पाडताना आणि इतर कामे करण्यासाठी 2 फेब्रुवारीला रात्री 10 वाजल्यापासून ते 3 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली. या मेगाब्लॉक दरम्यान लोअर परळ ते चर्चगेट या दरम्यान एकही लोकल चालविण्यात येणार नाही. विरार, वसई, भार्इंदर, बोरीवली येथून सुटणाºया गाड्या प्रभादेवी स्थानकापर्यंत चालविण्यात येतील. त्यापुढे लोकल सेवा उपलब्ध नसेल. लोकल फेºयांसह मेल, एक्स्प्रेसमधील वेळेत बदल होईल. काही गाड्या रद्द होतील. कामास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे.
अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे हद्दीतील 455 पुलांचा सुरक्षा आढावा घेण्यात आला. लोअर परळ स्थानकाजवळील पूल (डिलाईल पूल) गंजल्याचे स्पष्ट झाल्याने आयआयटीसह रेल्वेच्या संयुक्त समितीने पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे पश्चिम रेल्वेने पूल तोडून दुरुस्ती काम हाती घेतले.