मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक शुक्रवारी (28 जून) विस्कळीत झाली आहे. कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली आहे. आसनगाव ते खर्डी स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक 30 मिनिटे उशिराने सुरू आहे. तर धीम्या मार्गावरील वाहतूक 20 मिनिट उशिराने सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आसनगाव ते खर्डी स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला आहे. या बिघाडामुळे कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली तसेच मध्य रेल्वेच्या जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. मुंबई आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा फटका हा तिन्ही मार्गावरील लोकलसेवेला देखील बसला आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे. तर मध्य आणि पश्चिम मार्गावरील वाहतूक 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे स्थानकांबाहेर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
Mumbai Rain Update: पहिल्याच पावसात मुंबईकर बेहाल; वाहतूक मंदावली तर रेल्वेसेवाही उशिराने
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकरांना पावसाने आज सकाळपासून मोठा दिलासा दिला आहे. शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेद मंदावला आहे. तर रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रेल्वे उशिराने धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहतूक सेवा 15 ते 20 उशिराने धावत आहेत. मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने मुंबईच्या रस्ते वाहतुकीचा वेद मंदावला आहे. विक्रोळी, वडाळा, पवई या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरही वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. जोरदार पावसामुळे काही भागात जलमय झालेले आहे.
रेल्वे प्रशासनाचे लौजी, डोलवली, केळवली स्थानकांकडे दुर्लक्ष, प्रवाशांची गैरसोय
मध्य रेल्वे प्रशासनाचे कर्जत-खोपोली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या लौजी, डोलवली, केळवली स्थानकांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथे प्रवाशांना पाणी, शौचालयासारख्या मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत. nमध्य रेल्वे प्रशासन दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांविषयीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे; परंतु हवा तेवढा आर्थिक लाभ मिळत नसलेल्या रेल्वे स्थानकांच्या समस्यांकडे मध्य रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहे. कर्जत-खोपोली दरम्यान असलेल्या लौजी, डोलवली व केळवली रेल्वे स्थानकांची दुरवस्था झाली आहे. तिन्ही रेल्वे स्थानकात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे येथील प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील शौचालयांची अवस्था दयनीय आहे.