Join us

Mumbai Train Update : ओव्हरहेड वायरवर फांदी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 09:18 IST

रोज काही ना काही बिधाडामुळे खोळंबणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळीच विस्कळीत झाली आहे.

मुंबई - रोज काही ना काही बिधाडामुळे खोळंबणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळीच विस्कळीत झाली आहे. आज सकाळी मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, ही फांदी हटवल्यानंतर मरेची वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र ही वाहतूक उशिराने सुरू आहे. शनिवारी सकाळी मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर झाडाची फांदी तुटून ओव्हरहेट वायरवर पडली. त्यामुळे मध्य रेल्वेची सीएसएमटीवरून कल्याणला जाणारी वाहतुक खोळंबली आहे. दरम्यान, या खोळंब्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.  

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटमुंबई लोकल