Mumbai Train Update : अखेर मध्य रेल्वेकडून रविवार वेळापत्रक मागे, लोकल वाहतूक नियमितपणे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 12:35 PM2019-07-03T12:35:16+5:302019-07-03T12:37:10+5:30
मुसळधार पावसाची शक्यता गृहित धरून आज लोकलसेवेसाठी लागू केलेले रविवार वेळापत्रक मध्य रेल्वेने अखेर मागे घेतले असून, लोकलवाहतूक नियमितवेळापत्रकाप्रमाणे सुरू करण्यात आली आहे.
मुंबई - मुसळधार पावसाची शक्यता गृहित धरून आज लोकलसेवेसाठी लागू केलेले रविवार वेळापत्रक मध्य रेल्वेने अखेर मागे घेतले असून, लोकलवाहतूक नियमितवेळापत्रकाप्रमाणे सुरू करण्यात आली आहे. पावसामुळे वाहतुकीवर झालेला परिणाम विचारात घेऊन मध्य रेल्वेने आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकलसेवा चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यामुळे धावणाऱ्या लोकलचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याने सर्व स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. तसेच बराचवेळ थांबूनही लोकल येत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता.
As announced by CR, and looking at the forecast, suburban services now running as normal weekday schedule.
— Central Railway (@Central_Railway) July 3, 2019
CR appreciate the support extended by commuters.
सलग चार दिवस पावसाचा जोर कायम राहिल्याने, उपनगरी रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. मंगळवारी (2 जुलै) पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे रेल्वे मार्गावर पाणी साचले होते. त्यामुळेच आज (3 जुलै) मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला होता. रविवारच्या वेळापत्रकानुसार आज मध्य रेल्वेची वाहतूक असल्याने कमी लोकल धावत होत्या. गेल्या दोन दिवसांप्रमाणेच आजही जोरदार पावसाची शक्यता असल्याने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला होता. मात्र त्यामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.