मुंबई ट्रान्स हार्बर लिंक : बदलत्या हवामानावर लक्ष ठेवा, कामाचे नियोजन करून प्रकल्प वेळेत पूर्ण करा

By सचिन लुंगसे | Published: June 8, 2023 12:23 PM2023-06-08T12:23:16+5:302023-06-08T12:24:05+5:30

डॉ. संजय मुखर्जी यांच्या कंत्राटदार आणि सल्लागारांना सूचना

MUMBAI TRANS HARBOR LINK Keep an eye on the changing weather plan the work and complete the project on time | मुंबई ट्रान्स हार्बर लिंक : बदलत्या हवामानावर लक्ष ठेवा, कामाचे नियोजन करून प्रकल्प वेळेत पूर्ण करा

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक : बदलत्या हवामानावर लक्ष ठेवा, कामाचे नियोजन करून प्रकल्प वेळेत पूर्ण करा

googlenewsNext

मुंबई : मान्सूनच्या कालावधीत वातावरणीय बदल, अतिवृष्टी तसेच असमतोल हवामानामुळे समुद्राच्या मध्यभागी प्रगतीचा वेग राखणे कठीण बनते, यासाठी एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी कंत्राटदार आणि सल्लागारांना हवामानाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या तसेच त्यानुसार कामाचे नियोजन करून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पला भेट देऊन प्रकल्पाच्या मान्सून पूर्व तयारीचा आढावा डॉ. संजय मुखर्जी यांनी घेतला. त्यांनी प्रकल्पाचे पैलू समजून घेऊन प्रकल्पात आणखी काही सुधारणा करता येतील का ? यावर सर्वसमावेशक चर्चा केली.

भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या विविध घटकांची जसे की वॉटर प्रूफिंग आणि सरफेसिंग,  व्हायाडक्ट पिअर्स, सेगमेंटसमधली जोडणी आणि पोहाच मार्ग, प्रकल्पाची संरचनात्मक अखंडता आणि अतिवृष्टी सारख्या संभाव्य तसेच भरती-ओहोटी इत्यादींविरूद्ध सुरक्षितता सुनिश्चित करून करून मान्सून दरम्यान प्रकल्पाची प्रगती अखंड राहावी याची काळजी घेण्याच्या सूचनाही संजय मुखर्जी यांनी दिल्या.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जवळपास १६.५ किमी भाग सागरी हद्दीत आहे.  संपूर्ण मान्सून दरम्यान वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा सागरी सेतू पूर्णत्वाच्या अवस्थेत असल्याने पावसाळ्यापूर्वी सर्व तयारी पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

प्रकल्पाचा सखोल आढावा आणि मान्सून पूर्व तयारीची सर्व पाहणी केल्यानंतर, मला खात्री आहे की एमएमआरडीएची टीम पूर्णपणे सुसज्ज आहे आणि कोणत्याही हवामानात कार्यक्षमतेने काम करण्यास तयार आहे.
डॉ. संजय मुखर्जी,
आयुक्त, एमएमआरडीए

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्टतेचे उदाहरण आहे. ज्याने मुंबई शहराला भारताच्या मुख्य भुभागाशी जोडले आहे.  हा २२ किमी लांबीचा सागरी पूल आहे. ज्याचा १६.५ किमी भाग  समुद्रात आहे आणि ५.५ किमी लांबीचा भाग जमिनीवर आहे.

समुद्राच्या मध्यभागी पूर्णत्वाच्या वाटेवर असलेल्या एमटीएचएल अत्यंत महत्त्वाच्या अशा पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा महत्त्वाचा असतो. अशा प्रकारच्या मान्सून पुर्व आढाव्यांमुळे पावसाळ्यादरम्यान प्रकल्पाची प्रगती साधताना संभाव्य दुर्घटना तसेच व्यत्यय टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना असल्याची खात्री करण्यास मदत करतात.

Web Title: MUMBAI TRANS HARBOR LINK Keep an eye on the changing weather plan the work and complete the project on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई