मुंबई ट्रान्स हार्बर लिंक : सर्वात मोठ्या ऑर्थोट्रोपिक स्टील डेकची उभारणी
By सचिन लुंगसे | Published: November 1, 2022 09:41 AM2022-11-01T09:41:56+5:302022-11-01T09:43:03+5:30
दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे सध्याच्या १२० मिनिटांच्या प्रवासाच्या वेळेच्या तुलनेत केवळ २० मिनिटांत जाणे शक्य होणार आहे.
मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पात एमएमआरडीएने सर्वात लांब ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची यशस्वीरित्या उभारणी पूर्ण केली आहे. याची लांबी सुमारे १८० मीटर आणि वजन सुमारे २४०० मेट्रिक टन म्हणजेच ५ ते ६ बोईंग विमानांच्या वजना इतके आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असून, आज उभारण्यात आलेल्या डेकमुळे प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, असा विश्वास प्राधिकरणचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केला.
दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे सध्याच्या १२० मिनिटांच्या प्रवासाच्या वेळेच्या तुलनेत केवळ २० मिनिटांत जाणे शक्य होणार आहे. यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पाची किंमत १७,८४३ कोटी आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला शिवडी न्हावा शेवा प्रकल्प असे देखील म्हणतात. २२ किमी लांबीचा, समुद्रावर सुमारे १६.५ किमी लांबीचा आणि दोन्ही बाजूला जमिनीवर सुमारे ५.५ किमी लांबीचा ६ मार्गिका असलेल्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामध्ये मुंबईतील शिवडी, मुंबई खाडीवरील शिवाजी नगर आणि नवी मुंबईच्या चीर्ले येथे इंटरचेंजेस आहेत.
ओएसडी स्पॅन हे जपान, व्हिएतनाम, तैवान इत्यादी ठिकाणी असलेल्या फॅब्रिकेशन वर्कशॉप सुविधांमध्ये तयार केले जातात. भारतात ते वितरित केले जातात. ज्यामुळे जलद बांधकाम होणे शक्य होईल आणि डेक - संबंधित साईट वरील काम जलद गतीने पूर्ण होईल.
मुंबई : ६ बोईंग विमानांच्या वजनाएवढा स्टील डेक उभा राहिलाhttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/PBMN46ORTd
— Lokmat (@lokmat) November 1, 2022
- ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक हे एक पोलादी सुपरस्ट्रक्चर आहे.
- पुलाच्या लांबीच्या दिशेने तसेच त्यास लंब दिशेने दोन्ही बाजूंनी स्टीफनर वापरुन मजबूती केले आहे.
- यामुळे तितक्याच लांबीच्या काँक्रीटच्या सुपरस्ट्रक्चरच्या तुलनेत ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरचे वाहनांचे वजन पेलण्याची क्षमता वाढते.
- ओएसडी स्टील डेक सुपरस्ट्रक्चरचे काँक्रीट किंवा कंपोझिट गर्डर्सपेक्षा वजन कमी असते.
- भौगोलिक परिस्थिती नौकानयनाकरीता गाळे, समुद्रातील खोदकामगाळे आणि लांब गाळे असलेल्या मुंबई पारबंदर प्रकल्पाकरीता ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरचा वापर सुयोग्य आहे.
- केबल स्टेड किंवा सस्पेंशन प्रकारच्या सुपरस्ट्रक्चरपेक्षा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चर आर्थिक दृष्टया अधिकर परवडणारे आहे.