Join us

मुंबई, नवी मुंबईतील वाहतूक हाेणार वेगवान, ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प साडेचार वर्षांत हाेणार पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 6:17 AM

Mumbai Trans Harbour Link Project : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पांचे काम आहे. या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली.

मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पाइल, पाइल कॅप, पुलाच्या खांबाचे बांधकाम सुरू आहे. पुलाचे सेगमेंट बनविण्याचे काम कास्टिंग यार्डमध्ये सुरू केले. पुलाच्या गाळ्याचे सेगमेंट उभारणीचे काम अणि तात्पुरत्या पूल बांधकाम प्रगतिपथावर आहे. प्रकल्पाची अर्थिक प्रगती ४२ टक्के झाली आहे. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी साडेचार वर्षे आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पांचे काम आहे. या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली. प्रकल्पात शिवडी, मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या २२ कि.मी. लांबीच्या ६ पदरी पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी १६.५ कि.मी. तर, जमिनीवरील लांबी ५.५ कि.मी. आहे. पुलाला शिवडी व नवी मुंबईतील शिवाजीनगर, राज्य मार्ग - ५४ व राष्ट्रीय महामार्ग ४ ब व चिले गावाजवळ आंतरबदल आहेत.

प्रस्ताव ३० वर्षांपूर्वीचामुंबई येथील वाहतूककोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील प्रदेशाचा विकास करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचा प्रस्ताव ३० वर्षांपूर्वीपासून विचाराधीन होता. मुंबई व नवी मुंबई यामधील वाहतूक वेगवान व्हावी या हेतूने मुंबई बेटावरील शिवडी ते मुख्य भूमी (नवी मुंबई) वरील न्हावा यादरम्यान पूल बांधण्याचा विचार करण्यात आला होता. 

टॅग्स :मुंबईनवी मुंबई