मुंबई - मुंबईत रविवारी १ हजार २४३ रुग्ण , तर ४४ मृत्यूंची नोंद झाली. मुंबईत कोरोन बाधितांची एकूण संख्या ९२ हजार ९८८ असून बळींचा आकडा ५ हजार २८८ झाला आहे. सध्या मुंबईत २२ हजार ५४० रुग्ण उपचार घेत आहेत. शहर उपनगरात बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुपटीचा दर ५० दिवसांवर आहे.
५ ते ११ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३९ टक्के आहे. तर ११ जुलैपर्यंत मुंबईत कोविडच्या ३ लाख ९१ हजार २२२ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ४४ मृत्यूंमध्ये ३२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. ३२ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते. उर्वरित ८ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील आहेत. मुंबई दिवसभरात १ हजार ४४१ रुग्ण बरे झाले आहेत,तर आतापर्यंत ६४ हजार ८७२ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
पालिकेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत ३४ लाख ६४ हजार २८ घरांना तपासणीकरिता भेट दिली. यात ५ लाक ७५ हजार ४७६ ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी तपासण्यात आली. त्यातील २ हजार ४३७ ज्येष्ठ नागरिकांची आॅक्सिजनची पातळी कमी असल्याचे निदर्शनास आले , त्या नागरिकांना पुढील उपचारांसाठी संदर्भित कऱण्यात आले आहे.