मुंबई- जुळी भावंडं एकसारखी दिसतात. त्याच्या सवयी, आवडीनिवडीही बऱ्याच सारख्या असतात. पण जुळ्या भावांना परीक्षेत सारखेच मार्क मिळाल्याचं आजवर फार कमी ऐकायला मिळालं असेल. पण मुंबईत असे दोन भाऊ आहेत ज्यांना परीक्षेत सारखे मार्क मिळाले आहेत. रोहन आणि राहुल चेम्बाकसेरिल या जुळ्या भावडांना आयसीएसई बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षेत सारखे मार्क मिळाले. दोघांनाही 96.5 टक्के मिळाले.
रोहन आणि राहुल मुंबईच्या खार भागात राहतात. जसुदाबेन एमएम शाळेत त्यांचं शिक्षण सुरू आहे. या दोघांनाही विज्ञान विषयात करिअर करायचं आहे.
'रोहन आणि राहुल या दोघांच्या फक्त सवयीचं सारख्या नाहीत तर आवडीनिवडीही सारख्या आहेत. दोघं एकत्र आजरी पडतात त्यांना भूकही एकत्रच लागते. पण दोघांनी सारखेच मार्क मिळवल्यामुळे आम्हीही हैराण आहोत', असं रोहन-राहुलची आई सोनल यांनी सांगितलं. रोहन-राहुल घरी एकत्र अभ्यास करतात तसंच शाळेतही एकत्र अभ्यास करतात असंही त्या म्हणाल्या.