Join us

Mumbai: मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळील जमीन खचल्याने दोघे अटकेत,पोलिस म्हणतात पहिली घटना चुकीमुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 1:11 PM

Mumbai: मागाठाणे मेट्रो स्टेशनलगत असलेल्या जमिनीचा भाग लागोपाठ दोनदा खचल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेप्रकरणी कंत्राटदारासह साइट इंजिनिअरला जबाबदार धरत कस्तुरबामार्ग पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

मुंबई : मागाठाणे मेट्रो स्टेशनलगत असलेल्या जमिनीचा भाग लागोपाठ दोनदा खचल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेप्रकरणी कंत्राटदारासह साइट इंजिनिअरला जबाबदार धरत कस्तुरबामार्ग पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. मात्र, दुसऱ्या घटनेत सतत कोसळणारा पाऊस आणि मेट्रोखालून गेलेल्या पर्जन्य जलवाहिनीला तडे गेल्याने जमीन खचल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मेट्रोचे सेक्शन इंजिनिअर असलेले तेजस कांबळे (३२) यांच्या तक्रारीनुसार, २६ जून रोजी सकाळी अकरा वाजता मागाठाणे मेट्रो स्टेशनच्या पश्चिमेला सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पामुळे मेट्रोच्या बाजूने जमीन खचल्याची माहिती मिळाली. प्रत्यक्ष घटनास्थळी स्टेशनच्या बाजूला नवीन हॉस्पिटलच्या बांधकामासाठी खड्डा खोदण्यात आल्याचे आढळले. याच खोदकामामुळे जमिनीलगत असलेला मातीचा भाग ढासळून त्यालगत असलेला डांबरी रस्ता खचल्याचे दिसून आले. तसेच इमारतीच्या बांधकामाच्या आतल्या बाजूने खोदकामावर उभी भेग दिसून येताच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्टेशननजीकचा जिना प्रवाशांसाठी बंद करण्यात आला. यामध्ये बांधकाम साइटवर निष्काळजीपणे, तसेच योग्य काळजी न घेता इतरांच्या जिवास धोका निर्माण करून जमिनीत केलेल्या खोदकामामुळे माती ढासळून व रस्ता खचण्यास कारणीभूत झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी कस्तुरबामार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली.

तपास सुरू.....कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत संबंधित बांधकाम कंपनीचे कंत्राटदार आणि साइट इंजिनिअर जबाबदार दिसून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. दुसरी घटना २८ जून रोजी घडली असून, नैसर्गिक आपत्तीचा भाग असल्याचे दिसून आले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विकासकाला वाचविण्याचा प्रयत्न?मागाठाणे मेट्रो रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वार दोनजवळील पावसाळी पाणी वाहून नेणारे चेंबर स्थानकाचे जिने आणि एस्केलेटरच्या पायाच्या अगदी जवळ आहे. या पर्जन्य जल वाहिनीच्या चेंबरला लागूनच खोल जात आहे.खोदकामामुळे आजूबाजूची माती कोसळून चेंबरच्या भितीला तडे गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये आरोप प्रत्यारोपमध्ये विकासकाला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही बोलले

 

टॅग्स :मुंबई