मुंबईत अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 04:48 AM2019-06-20T04:48:58+5:302019-06-20T04:49:19+5:30

७ जुलैपासून कारवाई; वाहनतळालगतचा परिसर ‘नो पार्किंग झोन’

In Mumbai, unauthorized parking spouses will be fined up to Rs 10,000 | मुंबईत अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारणार

मुंबईत अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारणार

Next

मुंबई : शहरात १४६ ठिकाणी ३४ हजार ८०८ वाहने पार्क करण्याची सुविधा आहे. तरीही अनेक ठिकाणी रस्त्यावरच वाहने उभी करण्यात येत असल्याने मुंबईत वाहतूककोंडीची समस्या वाढते आहे. त्यामुळे वाहनतळांलगतचा एक किमी परिसर, दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते हे ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. येथे अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांना ७ जुलैपासून दहा हजार रुपयांपर्यंत दंड होणार आहे.

पार्किंगमध्ये शिस्त आणण्यासाठी दंडात्मक कारवाई सुरू करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बुधवारी अधिकाºयांना दिले. यासाठी विभागस्तरावर ठेकेदारांची नियुक्त करण्यात येणार आहे. अनधिकृत पार्किंग करू नये, याच्या जनजागृतीसाठी सूचना फलकही लावण्यात येणार आहेत. त्यानंतरही अनधिकृत पार्किंग करणाºयांवर कारवाई होणार आहे. वाहन उचलण्यासाठी येणारा खर्च संबंधित चालकाकडून वसूल करण्यात येणार आहे. दंडाची ही रक्कम एक हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल. पालिकेच्या सर्व सात परिमंडळीय उपायुक्त व सहआयुक्त (वाहतूक पोलीस) यांच्या समन्वयाने ही कारवाई होणार आहे.
टोइंग व्हॅनवर संबंधित ठेकेदाराला माजी सैनिकांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर, आवश्यकतेनुसार ‘टोइंग मशिन’ भाड्याने घेऊन वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

वाहनांची संख्या वाढतीच
गेल्या सहा वर्षांमध्ये मुंबईतील वाहनांची संख्या २० लाख २८ हजारांवरून ३३ लाख ५२ हजारांवर पोहोचली आहे. या तुलनेत वाहनतळ कमी असल्याने अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: In Mumbai, unauthorized parking spouses will be fined up to Rs 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.