- सचिन लुंगसे मुंबई : शहर आणि उपनगरात कोसळत असलेल्या पावसाचे पाणी शोषून घेण्याची येथील जमिनीची क्षमता काँक्रिटीकरणामुळे संपुष्टात आली असून, भरावामुळे समुद्रात पाणी शिरण्याच्या मुखांमध्ये अडथळे येऊ लागले आहेत. परिणामी, भरतीदरम्यान वेळोवेळी मुंबई तुंबण्याच्या किंवा मुंबईत पूर येण्याच्या घटना सातत्याने घडत असून, येथे साचत असलेल्या पूराच्या पाण्याच्या निचरा करण्याचे मोठे आव्हान मुंबई महापालिका प्रशासनासमोर आहे.महत्त्वाचे म्हणजे २६ जुलै २००५ रोजी मुंबईत पडलेल्या ९४४ मिलीमीटर पावसामुळे मुंबापुरी पाण्याखाली गेली होती. प्रत्यक्षात या घटनेनंतर महापालिकेने अद्यापही पाण्याचा निचरा होण्यासाठी अपेक्षित बदल केलेले नाहीत. परिणामी, ३०० मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरही मुंबईचे जनजीवन विस्कळीत होत असून, महापूर नाही; पण येथील पूराचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.
२६ जुलै २००५ च्या महापूराला आज १३ वर्षे पूर्ण होत असतानाच मागील कित्येक वर्षांत येथे पडलेल्या पावसाची नोंद ३०० मिलीमीटरहून अधिक झालेली नाही. मात्र, तरिही प्रत्येक पावसाळ््यात मुंबई पाण्याखाली जात असून, यास अनेक घटक कारणीभूत आहेत. सातत्याने येथे होत असलेल्या भरावांमुळे नव्या ठिकाणीही पावसाचे पाणी साचत असून, मुंबईला पूराच्या तडाख्यातून सोडविणे महापालिकेला नव्या यंत्रणाही राबवूनही जमलले नाही. विकसित देशांमध्ये मुसळधार पावसापासून शहराला वाचविण्यासाठी ‘मायक्रो फ्लड मॉडेलिंग’ सारखे प्रकल्प अंमलात येत आहेत. २६ जूलै २००५ च्या महापूरानंतर मुंबई शहरातही ज्या ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते तेथे ‘मायक्रो फ्लड मॉडेलिंग’ प्रकल्प आणावेत, अशी मागणी तज्ज्ञांनी पालिकेकडे केली.
मात्र पालिकेने याबाबत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. दरम्यान, नॅशनल एनव्हायरमेंटल इंजिनियरींग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, पुरजन्य परिस्थितीतून बोध घेत पालिकेने मायक्रो फ्लड मॉडेंलिग प्रकल्प अंमलात आणणे गरजेचे आहे. पर्जन्य जल वाहिन्या सुधारण्यासह अद्ययावत करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. संपुर्ण शहराचा, प्रामुख्याने सखल भागांचा अभ्यास करत पाणी साचले तर ते कसे बाहेर काढायचे? याबाबत विचार होणे गरजेचे आहे.पावसाच्या साचत्या पाण्याचा धोका वाढतच असून, बीकेसी, ठाणे, भिवंडी, अॅन्टॉप हिल येथील परिसरांना महापूराचा अधिकच धोका असल्याचे सर्वेक्षणांतून समोर येते आहे. या ठिकाणांमध्ये मुंब्रा, कळवा, उल्हास नदी परिसर, ठाणे खाडीलगतच्या परिसराचाही समावेश आहे.पूरजन्य परिस्थितीतलावांचा नाश करून आपण पूरजन्य परिस्थितीला सामोरे जात आहोत. विविध पाश्चिमात्य देशांतील शहरांमध्ये पाण्याची समस्या सुटावी याकरिता कृत्रिमरीत्या तलाव तयार करतात. परंतु आपल्या देशात निसर्गाने दिलेल्या तलावांचाही आपण नाश करत आहोत.काही नवीन ठिकाणेदरवर्षी पावसाळ्यात हमखास पाणी तुंबणाºया २२५ ठिकाणांव्यतिरिक्त काही नवीन ठिकाणे या वर्षीच्या पावसाळ्यात आढळून येऊ शकतात. अशा काही नवीन ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास अधिक वेळ लागल्याचे लक्षात आल्यास त्याची नोंद करून आॅक्टोबर २०१८ पासूनच उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.तापमान वाढ आणि महापूरजागतिक तापमानवाढीसह हवामानात होत असलेल्या बदलांमुळे शंभर वर्षांत नवी पृथ्वी शोधावी लागेल, असा इशारा यापूर्वीच शास्त्रज्ञांनी दिला आहे.मुंबईमध्ये धोका कोणाला?कालिना, अॅन्टॉप हिल, धारावी, भांडूप, कांजुरमार्ग, शिवाजी नगर, मुलुंड पूर्व, वांद्रे पूर्व, बीकेसी, चेंबूर, भिवंडी, ठाणे, मुंब्रा, दिवा, कळवा.महापूराचा धोका कोणाला?अहमदाबाद, चेन्नई, मुंबई, बंगळुरु, कोलकाता, दिल्ली, हैद्राबाद, कोची, भुवनेश्र्वर, अलाहाबाद.कच-याने अडले पाणीपावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने करण्यासाठी बांधलेले पंपिंग स्टेशन कचºयामुळे बंद पडत होते. मात्र, यासाठी आणलेल्या ट्रॅश ब्रुमचा प्रयोग सफल झाला आहे. लव्हग्रोव्ह व इर्ला पंपिंग स्टेशनवर बसविलेल्या या झाडूमुळे वाहून येणारा कचरा बाजूला होऊन पाण्याचा निचरा जलद गतीने होत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला.