मुंबई विद्यापीठाच्या बीएससी आयटीचा निकाल ७६.६० टक्के; परीक्षेत ४,५२० विद्यार्थी उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 09:54 AM2024-06-10T09:54:45+5:302024-06-10T09:59:09+5:30
मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बीएससी आयटी सत्र ६ या महत्त्वाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
मुंबई :मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बीएससी आयटी सत्र ६ या महत्त्वाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत ४,५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.६० एवढी आहे.परीक्षेत ७,८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर, ७,६९५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.
यामध्ये ४,५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, १,३८१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. परीक्षेचा निकाल ७६.६० टक्के लागला आहे. १८० विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. ३२ विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. ८१४ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत, तसेच विविध कारणांनी प्रवेश निश्चित न झाल्याने ९४८ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.
विद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या उन्हाळी सत्राचे ७९ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.