Join us

मुंबई विद्यापीठ : हिवाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 2:05 AM

यंदा उन्हाळी सत्र निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्न मुंबई विद्यापीठाकडून झाला. सोबतच हिवाळी सत्र परीक्षांसाठीही विद्यापीठ सज्ज झाले आहे.

मुंबई : यंदा उन्हाळी सत्र निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्न मुंबई विद्यापीठाकडून झाला. सोबतच हिवाळी सत्र परीक्षांसाठीही विद्यापीठ सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाने द्वितीय सत्र २०१८च्या (हिवाळी सत्राच्या) महाविद्यालयीन प्रथम व द्वितीय वर्षाच्या व विद्यापीठ स्तरावरील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हिवाळी सत्रात विद्यापीठ एकूण ६६१ परीक्षा घेणार आहे. या सर्व परीक्षा ४ आॅक्टोबर २०१८ पासून सुरू होत असून, २२ जानेवारी २०१९ पर्यंत सुरू राहतील. विशेष म्हणजे, या वेळी हिवाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा एक महिना आधी विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. दुसरीकडे उन्हाळी सत्रातील निकाल अद्याप विद्यापीठाने जाहीर केलेले नाहीत.सर्व परीक्षांच्या तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर असून, याचे वेळापत्रकही लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या मोठ्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले असले, तरी अद्याप पदव्युत्तर पदवी, लॉ, आयडॉलच्या विद्यार्थ्यांचे सुमारे २७० अभ्यासक्रमांचे निकाल रखडलेलेच आहेत. मूल्यांकनाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, लवकरच निकाल जाहीर केले जातील, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव विनोद माळाले यांनी सांगितले.निकाल वेळेवर लागणारउन्हाळी सत्राचे परीक्षांचे मूल्यांकन वेळेत झाल्याने, निकाल वेळेत जाहीर झाले व होत आहेत. यानुसार, या शैक्षणिक वर्षाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा वेळेत सुरू करून, त्यांचा निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य राहील.- डॉ. अर्जुन घाटुळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळविद्यापीठाच्या परीक्षाक्र. परीक्षा परीक्षेची तारीख१ बीकॉम सत्र ५ २४ आॅक्टोबर २०१८२ बीएस्सी सत्र ३० आॅक्टोबर २०१८३ बीए सत्र ५ १३ नोव्हेंबर २०१८४ बीएमएम सत्र ५ १३ नोव्हेंबर २०१८५ सत्र ५ च्या परीक्षा बीकॉम (फायनान्शियल मार्केट्स)बीकॉम (बँकिंग व इन्शुरन्स)बीकॉम (अकाउंटिंग व फायनान्स)बीकॉम (फायनान्शियल मॅनेजमेंट)बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट)बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट) १९ नोव्हेंबर २०१८६ बीएमएस सत्र ५ १९ नोव्हेंबर २०१८७ बीएस्सी आयटी सत्र ५ २० नोव्हेंबर, २०१८महाविद्यालयीन परीक्षाद्वितीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी सत्र - ३ २४ आॅक्टोबर २०१८प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी सत्र - १ २८ नोव्हेंबर २०१८द्वितीय वर्ष बीएमएस व बीएस्सी आयटी,बीएमएम सत्र - ३ २५ आॅक्टोबर २०१८प्रथम वर्ष बीएमएस व बीएस्सी आयटीबीएमएम सत्र - १ २९ नोव्हेंबर २०१८

टॅग्स :मुंबई विद्यापीठ