हितेन नाईक पालघर : दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक घरात, दुकानात पाणी शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले. नालासोपारा आदी भागात रेल्वे ट्रॅक मध्ये पाणी साचल्याने पश्चिम रेल्वे च्या अनेक गाड्या विलंबाने धावत होत्या. तर लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर डहाणू रेल्वे स्टेशन दरम्यान थांबवून काही गाड्या माघारी गुजरात च्या दिशेने पाठविण्यात आल्यात. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले असून अनेक स्थानकात स्थानिक लोक, संघटनांनी प्रवाशांची जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. जिल्ह्यात कुठेही जीवित व वित्तहानीची घडलेली नाही.
येत्या २४ तासात पालघर सह मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाकडून सकाळी प्रथम आॅरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र काही काळाने पावसाचा जोर वाढल्याने रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाबेर पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सव सणा निमित्ताने मुंबई विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना तर शाळांना शिक्षण विभागाने आठवडाभराची सुट्टी जाहीर केली आहे.
गुजरात मधून मुंबईच्या दिशेने जाणारी कर्णावती एक्सप्रेस रेल्वे ट्रॅक मध्ये हे पाणी भरल्याने दुपारी अकराच्या दरम्यान पालघर स्थानकात थांबविण्यात आली ही गाडी दुपारी तीन वाजेपर्यंत स्थानकात होती. जिल्ह्यातील ११० किलोमीटरच्या किनारपट्टीवरील वसई ते झाई-बोर्डी दरम्यानच्या अनेक बोटी ग्मासेमारी बंद ठेवून किनाºयावरच विसवलेल्या आहेत. समुद्रात वादळी वारे वाहत असल्याबाबत मच्छीमाराना कुठलाही धोक्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात न आल्याने मंगळवारी सातपाटी बंदरातून मासेमारीला गेलेल्या ४ ते ५ बोटी संध्याकाळ पर्यंत बंदरात परतल्या नव्हत्या. मात्र ह्या बोटी किनाºया पासून जवळच १४ समुद्रात सुखरूप होत्या.