Join us

मुंबई विद्यापीठाचा बी.एस्सी सत्र ६ चा निकाल ३७.५४ टक्के

By रेश्मा शिवडेकर | Updated: May 23, 2024 21:46 IST

मुंबई :   मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी.एस्सी सत्र ६ या ...

मुंबई :  मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी.एस्सी सत्र ६ या परीक्षेचा निकाल ३६.५४ टक्के इतका लागला आहे. 

या परीक्षेत ८,२६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ७,९४७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी अवघे २,०९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ३,५९१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ३७.५४ टक्के एवढा लागला आहे. ३२१ विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. ४० विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर १२५१ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध कारणांनी प्रवेश निश्चित न झाल्याने १०६७ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.५३ निकाल जाहीरविद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या उन्हाळी सत्राचे ५३ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर  प्रदर्शित करण्यात आले आहेत.

टॅग्स :मुंबई