मुंबई - अनेक विकासकामांना प्राधान्यक्रम देत मुंबई विद्यापीठाचा २०२० - २१ सालचा ८०९.२४ कोटी रुपयाचा आणि ६६. ८० कोटींची तूट असलेला अर्थसंकल्प शुक्रवारी रात्री उशिरा अधिसभेत मंजूर करण्यात आला. यामध्ये विद्यापीठ उपपरिसरातील पायाभुत सुविधा (सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी, ठाणे), डिसेबल्ड फ्रेन्डली कॅम्पसेस, शैक्षणिक सुविधा (नविन अभ्यासक्रम व त्यासंदर्भातील उपक्रम), स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र, अपग्रेडेशन ऑफ आयसीटी इंफ्रास्ट्रक्चर, डिजीटल लायब्ररी, विद्यापीठ परिसराचे सुशोभिकरण, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह अशा बाबींवर आधारीत विशेष अर्थसंकल्पीय तरतूदींसह विद्यापीठ सुधारणांवर भर देण्यात आली आहे.
याबरोबरच २०२०- २०२१ या वर्षामध्ये नियोजित बांधकामांना विशेष प्राधान्यक्रम देण्यात आला असून यामध्ये स्कुल ऑफ लॅंग्वेजेस इमारत (२ रा टप्पा), आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (२ रा टप्पा), चतुर्थश्रेणी कर्मचा-यांकरिता निवासस्थान टाईप-२, नविन ग्रंथालय इमारत, नविन परिक्षा भवन, प्रो. बाळ आपटे दालन, मुलींचे नविन वसतिगृह, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (१ ला टप्पा), श्री. राजीव गांधी इमारत (२ रा टप्पा), वर्कशॉप इमारतीची दुरुस्ती, महर्षी धोंडो केशव कर्वे मुलींच्या वसतिगृहाची दुरुस्ती, आय. टी. पार्क इमारत (आतील कामे) अशा नियोजित बांधकामाना प्राधान्य देण्यात आले आहे.
अर्थसंक्लपीय वर्ष २०२०-२०२१ चे अंदाजपत्रकात समाविष्ट असलेल्या नवीन योजना/ उपक्रम त्याकरीता केलेली तरतुद-क्र- अर्थसंकल्प वर्ष अंदाज २०२०-२०२१- रुपये (कोटीमध्ये)
१.विद्यापीठ उपपरिसरातील पायाभुत सुविधा (सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी, ठाणे)-४०.००
२.डिसेबल्ड फ्रेन्डली कॅम्पसेस-२२.५०
३.शैक्षणिक सुविधा (नविन अभ्यासक्रम व त्यासंदर्भातली उपक्रम)-१०.००
४.स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र-९.००
५.अपग्रेडेशन ऑफ आयसीटी इंफ्रास्ट्रक्चर-५.००
६.डिजीटल लायब्ररी-५.००
७.विद्यापीठ परिसराचे सुशोभिकरण -५.००
८.आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह-१.००