मुंबई विद्यापीठ : पुनर्मूल्यांकनाच्या निकालाचे आव्हान संपेना, दीक्षान्त समारंभाआधी सर्व निकाल जाहीर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:14 AM2018-02-12T03:14:12+5:302018-02-12T03:14:27+5:30

मुंबई विद्यापीठाच्या १६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे उडालेला गोंधळ अजूनही सुरूच आहे.

Mumbai University: To end the challenge of re-assessment, to announce all the results before the conclave | मुंबई विद्यापीठ : पुनर्मूल्यांकनाच्या निकालाचे आव्हान संपेना, दीक्षान्त समारंभाआधी सर्व निकाल जाहीर करणार

मुंबई विद्यापीठ : पुनर्मूल्यांकनाच्या निकालाचे आव्हान संपेना, दीक्षान्त समारंभाआधी सर्व निकाल जाहीर करणार

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या १६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे उडालेला गोंधळ अजूनही सुरूच आहे. आॅनलाइन तपासणीतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी दिल्या आहेत, पण दीक्षान्त समारंभाला अवघे १० दिवस उरले असताना, तब्बल अडीच ते ३ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याचे आव्हान विद्यापीठासमोर आहे.
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रात झालेल्या परीक्षांचे मूल्यांकन करण्यासाठी आॅनलाइन पद्धतीचा वापर केला गेला. अनुभव नसलेल्या कंपनीला हे आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचे कंत्राट देण्यात आले, त्यातच प्राध्यापकांनाही योग्य प्रशिक्षण मिळाले नाही. त्यामुळे उत्तरपत्रिकांच्या तपासणीत अनेक अडथळे आले. परिणामी, ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडला, पण सर्व निकाल जाहीर करूनही विद्यापीठाचे काम संपले नव्हते. कारण उत्तरपत्रिका तपासणीत झालेल्या चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसून मनस्ताप सहन करावा लागला होता.
नोव्हेंबर महिन्यापर्यंत विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या निकालातील चुका दुरुस्त करीत होते, तसेच अनेक विद्यार्थ्यांचे निकालही नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात आले, पण विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालाविषयी विद्यार्थ्यांना साशंकता असल्याने, हजारो विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी दिल्या आहेत.
उरले अवघे १० दिवस-
या उत्तरपत्रिकांची तपासणीही आॅनलाइन पद्धतीने सुरू आहे. या प्रक्रियेमुळे दीक्षान्त समारंभालाही यंदा लेटमार्क लागला. जानेवारीत होणारा दीक्षान्त समारंभ अखेर २२ फेब्रुवारीला होणार आहे.
अजूनही पुनर्मूल्यांकनाची तपासणी पूर्ण झालेली नाही. तब्बल अडीच ते ३ हजार निकाल विद्यापीठाला जाहीर करायचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. अवघ्या दहा दिवसांत विद्यापीठाला हे निकाल जाहीर करायचे आहेत, पण विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, दीक्षान्त समारंभाआधीच विद्यापीठ हे काम पूर्ण करणार आहे.

Web Title: Mumbai University: To end the challenge of re-assessment, to announce all the results before the conclave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.