Join us

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं निधन; ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 4:02 PM

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं आज निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या.

मुंबई- मुंबई विद्यापीठीच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं आज निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. डॉ. स्नेहलता देशमुख या शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठात्या होत्या. देशमुख यांची १९९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. या पाच वर्षाच्या काळात त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. 

डॉ. स्नेहलता देशमुख या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती. कुलगुरू पदावर असताना त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. 

विद्यापीठाच्या कुलगुरू असताना त्यांनी शिक्षण पद्धतीतले नवे बदल यामुळे त्या विशेष चर्चेत राहिल्या. त्यांनी शिक्षणही मुंबईतच घेतले.त्यांनी दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या शाळेतून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी रुईया महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले.

टॅग्स :मुंबईमुंबई विद्यापीठ