मुंबई विद्यापीठ देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत
By रेश्मा शिवडेकर | Published: June 6, 2024 06:31 PM2024-06-06T18:31:20+5:302024-06-06T18:31:36+5:30
विद्यापीठाने १००१ – १२०० च्या क्रमवारीच्या बँडमधून यावर्षी ७११-७२० बँडमध्ये प्रवेश केला आहे
मुंबई : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली आहे. तर आशियातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाच्या यादीत विद्यापीठाने ६७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
विद्यापीठाने १००१ – १२०० च्या क्रमवारीच्या बँडमधून यावर्षी ७११-७२० बँडमध्ये प्रवेश केला आहे. विषयनिहाय क्रमवारीत जागतिक क्रमवारीत १०१-१५० या बँडमध्ये प्रवेश केला आहे.
विद्यापीठाची कामगिरी
एंप्लॉयमेंट आऊटकम- ८१.४ गुण
सायटेशन पर फॅकल्टी - ३०.९
एंप्लॉयर रेप्युटेशन - २८.८
इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क - १८.३
एकेडमिक रेप्युटेशन - ९.१
फॅकल्टी स्टूडेंट्स रेशो - २.८
कामगिरी का सुधारली
-विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत विविध व्यावसायिक आणि कौशल्याधारीत अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
-देशपातळीवर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही अतुलनीय
-पाच वर्षात विद्यापीठात १०४ टक्क्यांनी पदवी आणि ११२ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली
-आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समधील संशोधन पेपर्समध्ये १५६ टक्क्यांनी वाढ
-विद्यापीठाच्या १२ विभागांना अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात मान्यता
-विद्यापीठाशी सलंग्नित असलेले ८० हून अधिक प्राध्यापक हे विविध व्यावसायिक कार्यकारणींवर कार्यरत
-गेल्या पाच वर्षात १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने येथील प्राध्यापकांना गौरविण्यात आले
आयआयटीसह राज्यातील चार शिक्षणसंस्था क्रमवारीत
मुंबई आयआयटीसह पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी यांनी गेल्या वर्षाच्या तुलनेत आपल्या कामगिरीत सुधारणा करत क्यूएसच्या जागतिक क्रमवारीतील पहिल्या १००० शिक्षणसंस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. यात मुंबई आयआयटी देशात पहिल्या स्थानावर आहे.
मुंबईच्या तुलनेत पुणे विद्यापीठाची कामगिरी सरस
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ७११-७२० च्या बँडमधून ६३१-६४० च्या बँडमध्ये प्रवेश केला आहे. त्या खालोखाल सिम्बॉयसिस ६४१-६५० या बँडमध्ये आहे तर मुंबई विद्यापीठाने ७११-७२० बँण्डमध्ये प्रवेश केला आहे.