नॅनोसायन्स, नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू, १६ जूनला परीक्षा, बहुविद्याशाखीय अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 07:55 AM2024-06-12T07:55:26+5:302024-06-12T07:55:48+5:30

Mumbai University: मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्सेस अँड नॅनोटेक्नॉलॉजीमार्फत राबविण्यात येणाऱ्या एम.एस्सी. या पूर्णवेळ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. नोंदणीसाठी १५ जून २०२४ ही अंतिम तारीख आहे.

Mumbai University: Nanoscience, Nanotechnology center admission process starts, exam on 16th June, multidisciplinary studies | नॅनोसायन्स, नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू, १६ जूनला परीक्षा, बहुविद्याशाखीय अभ्यास

नॅनोसायन्स, नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू, १६ जूनला परीक्षा, बहुविद्याशाखीय अभ्यास

 मुंबई - मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्सेस अँड नॅनोटेक्नॉलॉजीमार्फत राबविण्यात येणाऱ्या एम.एस्सी. या पूर्णवेळ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. नोंदणीसाठी १५ जून २०२४ ही अंतिम तारीख आहे.

अत्याधुनिक उपकरणे, पायाभूत सुविधा आणि सुसज्ज प्रयोगशाळा असलेले विद्यापीठातील एक प्रमुख संशोधन केंद्र म्हणून या विभागाची ख्याती आहे. विद्यार्थ्यांना नॅनोसायन्स, नॅनोटेक्नॉलॉजीबाबत सर्वसमावेशक समज तयार व्हावी, या उद्योन्मुख क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन आणि त्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांसह सुसज्ज करण्यासाठी या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रगत मायक्रोस्कोपी, क्ष-किरण विवर्तन, विद्युत चालकता, चुंबकीय मोजमाप अशा अत्याधुनिक सुविधांच्या सहाय्याने अध्ययन आणि संशोधन करण्याची संधी मिळू शकेल. 

प्रवेश परीक्षेसाठी...
https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर https://forms.gle/QbMMx51iCgPG65uN8 या गुगल फॉर्मवर जाऊन नोंदणी करणे अनिवार्य असेल. 

काम करण्याची संधी 
जॉब ट्रेनिंगसाठी एक्सेल इन्स्ट्रुमेंट, आदित्य बिर्ला सायन्स अँड टेक्नॉलॉजी कं. यासह ओरलिकॉन बाल्झर्स कोटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सरफेस मॉडिफिकेशन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, अँट्स सिरॅमिक्स लिमिटेड, दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड या कंपन्यांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळते, असे प्रभारी संचालक प्रा. विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.

Web Title: Mumbai University: Nanoscience, Nanotechnology center admission process starts, exam on 16th June, multidisciplinary studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.