पुनर्मूल्यांकनासाठी मुंबई विद्यापीठ ऑनलाइन; निकाल वेळेत लावणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:33 AM2019-10-31T01:33:54+5:302019-10-31T01:34:16+5:30

मे २०१९ च्या पहिल्या सत्रासाठी ७० हजार अर्ज प्राप्त

Mumbai University Online for reevaluation; The results can be timely | पुनर्मूल्यांकनासाठी मुंबई विद्यापीठ ऑनलाइन; निकाल वेळेत लावणे शक्य

पुनर्मूल्यांकनासाठी मुंबई विद्यापीठ ऑनलाइन; निकाल वेळेत लावणे शक्य

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर अधिक सक्षम रीतीने करण्यात येत आहे. या वर्षी मे २०१९ चे पुनर्मूल्यांकनाचे अर्ज आणि त्यांच्या छायांकित प्रती या पूर्णत: आॅनलाइन पद्धतीने मागविण्यात आल्या आणि त्यांचे निकालही लावण्यात आले. मे २०१९ च्या परीक्षेचे तब्बल ७० हजार अर्ज हे आॅनलाइन पद्धतीने पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला यंदा प्राप्त झाले. ऑनलाइन स्वीकारण्यात आलेल्या अर्जांमुळे त्याचे निकाल वेळेत लावणे मुंबई विद्यापीठाला शक्य झाल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन व छायाप्रतींसाठीचे अर्ज आॅनलाइन स्वीकारण्यासाठी विद्यापीठाच्या केंद्रीय संगणक सुविधा विभागाकडून सॉफ्टवेअर प्रोग्रॅम तयार केला असून सिनीअर सिस्टीम प्रोग्रॅमर मनीषा संसारे यांनी तो तयार केला आहे. हा इनहाउस प्रोग्रॅम तयार करताना परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील व पुनर्मूल्यांकन विभागाचे उपकुलसचिव हिंमत चौधरी यांनीही साहाय्य केले. त्यानंतर २०१९ मध्ये विद्यापीठाने घेतलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठीचे पुनर्मूल्यांकन व छायांकित प्रतींसाठीचे अर्ज प्रथमच आॅनलाइन स्वीकारण्यात आले. अर्ज परीक्षानिहाय प्राप्त झाल्यानंतर एकाच वेळी पुनर्मूल्यांकनासाठी उपलब्ध झाले. त्यामुळे संबंधित परीक्षकांना पुनर्मूल्यांकन करणे सोयीचे झाल्यामुळे निकाल विहित कालावधीत जाहीर करणे शक्य झाले, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक विनोद पाटील यांनी दिली.

या सॉफ्टवेअरमुळे पुनर्मूल्यांकन व छायांकित प्रतीचे अर्ज आॅनलाइन केल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात न जाता, थेट आॅनलाइन अर्ज करू शकतो. यामुळे विद्यापीठाकडे हे अर्ज तत्काळ येतात व विद्यापीठाकडून त्यावर प्रक्रिया करून पुनर्मूल्यांकन करण्यासाठी शिक्षकांसाठी ते आॅनलाइन ओएसएमद्वारे उपलब्ध करून दिले जातात. ज्या विद्यार्थ्यांनी छायांकित प्रतींसाठी अर्ज केला असेल, त्या विद्यार्थ्यांच्या ई-मेलवर त्यांच्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत पाठविली जाते.

याआधी महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेत व ते एका सीडीमध्ये विद्यापीठाकडे पाठवत असत. म्हणजे निकाल लागल्यापासून तो पेपर शिक्षकांना पूनर्मूल्यांकनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी जात होता. तो कालावधी या आॅनलाइन प्रणालीमुळे वाचला असून महाविद्यालयाचा ताणही यामुळे कमी होत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू
२०१९च्या द्वितीय सत्रात घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठीचे पुनर्मूल्यांकन व छायांकित प्रतींसाठींचे अर्ज हेदेखील आॅनलाइन घेण्यात येणार असून यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू आहे. - डॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

नव्या सॉफ्टवेअरमुळे पुनर्मूल्यांकन तसेच छायांकित प्रतीचे अर्ज आता विद्यार्थी थेट आॅनलाइन करू शकतात. साहजिकत अर्ज करण्यासाठी त्यांना महाविद्यालयात फेºया मारण्याची गरज राहिलेली नाही. शिवाय आॅनलाइन प्रणालीमुळे विद्यापीठाकडे हे अर्ज तत्काळ येतात व विद्यापीठाकडून त्यावर प्रक्रिया करून त्यांनतर ते पुनर्मूल्यांकनासाठी शिक्षकांकडे आॅनलाइन ओएसएमद्वारे उपलब्ध करून दिले जातात.

Web Title: Mumbai University Online for reevaluation; The results can be timely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.