Join us

मुंबई विद्यापीठ: तक्रारींचे निवारण आॅनलाइन, विद्यार्थ्यांसाठी नवीन संकेतस्थळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 4:20 AM

मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. आॅनलाइन तपासणीमुळे लागलेल्या निकालात गोंधळ झाला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. आॅनलाइन तपासणीमुळे लागलेल्या निकालात गोंधळ झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या शंकांचे निराकरण आता मुंबई विद्यापीठ आॅनलाइन पद्धतीनेच करणार आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी निवारणासाठी विद्यापीठाने नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे.मुंबई विद्यापीठात अजूनही उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. विद्यापीठाला अजूनही १४ निकाल जाहीर करायचे आहेत. ४७७ निकालांपैकी विद्यापीठाने आतापर्यंत ४६३ निकाल जाहीर केले आहेत. पण या निकालांमध्ये गोंधळ झाले आहेत. अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत, काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अथवा नोकरीसाठी योग्य निकाल मिळावा म्हणून विद्यार्थी कालिना कॅम्पसमधील परीक्षा भवनाच्या पायºया झिजवत आहेत. विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून विद्यापीठाने नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे.वाणिज्य शाखेचा निकाल लागल्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. संकेतस्थळ बंद पडल्याने अनेक विद्यार्थी त्रस्त झाले होते. वाणिज्य निकालानंतर आलेल्या ५०० हून अधिक तक्रारींचे निवारण झाले आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत अशा विद्यार्थ्यांचे निकाल हे येत्या १० दिवसांत लावण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. यासंदर्भात परीक्षा विभागातर्फे परिपत्रक पाठवण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले.विधि शाखेच्या निकालासंदर्भात ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे शून्य ते चौदा (०-१४) असे गुण देण्यात आले होते, अशा ९६७ विद्यार्थ्यांचे यशस्वीरीत्या निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचेही घाटुळे यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नयेज्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये विषयनिहाय किंवा निकालपत्रात (गॅजेट कॉपी) गैरहजर असा शेरा येत असला तरी विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये.त्यांच्या निकालपत्राच्या शेवटच्या रकान्यामधील शेरा पाहावा, त्या रकान्यामध्ये फफ असा उल्लेख असल्यास अशा विद्यार्थ्यांचे निकाल हे राखीव ठेवण्यात आले असून अशा विद्यार्थ्यांचे निकाल येत्या १० दिवसांत लावण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठविद्यार्थी