Join us

मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 9:48 PM

14 जानेवारी 2019 रोजी डॉ. अजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती.

ठळक मुद्देमुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर नियुक्त डॉ. अजय देशमुख हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलसचिव पदावर कार्यरत होते.त्यापूर्वी ते डायरेक्टर बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट या पदावर कार्यरत होते. 

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे गुरुवारी रात्री निधन झाल्याची माहिती विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आली. अजय देशमुख यांच्यावर कॅन्सरवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. 

14 जानेवारी 2019 रोजी डॉ. अजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर नियुक्त डॉ. अजय देशमुख हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलसचिव पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी ते डायरेक्टर बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट या पदावर कार्यरत होते. 

डॉ. अजय देशमुख यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण एम. ए. इंग्रजी या विषयात तर पीएचडीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. वर्षभरातच मुंबई विद्यापीठाची कुलसचिव पदाची धुरा जबाबदारीने सांभाळली असल्याने त्यांच्या निधनाने विद्यापीठ अधिकारी, सिनेट सदस्य आणि विद्यापीठ प्रशासनाकडून हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी बातम्या...

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास मोफत सुरू राहणार, दुसऱ्यांदा परिपत्रक रद्द

जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात 5 मुलं बुडाली

टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या...    

'या' राज्यात 1088 अत्याधुनिक रुग्णवाहिका सुरू; अवघ्या काही मिनिटांत लोकांपर्यंत पोहोचतील    

TikTok सारखं भारतीय Moj अ‍ॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स    

भारतालाही 'डिजिटल स्ट्राइक' करणे माहीत आहे - रविशंकर प्रसाद    

टॅग्स :मुंबई विद्यापीठ