Join us  

‘इंद्रधनुष्य’मध्ये मुंबई विद्यापीठाची बाजी

By admin | Published: January 30, 2016 2:55 AM

तेराव्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये मुंबई विद्यापीठाने बाजी मारली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २२ ते २६ जानेवारी

मुंबई : तेराव्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये मुंबई विद्यापीठाने बाजी मारली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २२ ते २६ जानेवारी २०१६ दरम्यान आयोजित केलेल्या या महोत्सवात संगीत, नृत्य, नाटक, लिटररी आणि फाइन आर्ट या पाच विभागांमध्ये स्पर्धा घेतल्या होत्या. त्यापैकी संगीत, नृत्य आणि नाटक या तीन विभागांतील स्पर्धांमध्ये विद्यापीठाने ५९ गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले आहे.महोत्सवात राज्यातील २० विद्यापीठे सहभागी झाली होती. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या युवा महोत्सवामध्ये भाग घेऊन स्पर्धांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. शिवाय ‘गोल्डन बॉय’ म्हणून यशोमन आपटे आणि ‘गोल्डन गर्ल’ म्हणून तृप्ती दामले यांनी बाजी मारली आहे.मुंबई विद्यापीठाने केलेल्या या देदीप्यमान कामगिरीमुळे आज राज्यस्तरावर मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक होतो आहे, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. मनाली लोंढे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, विद्यापीठ प्रशासनाच्या सहकार्याने ही विजयी पताका फडकावता आली आहे. म्युझिकल ट्रॉफी ओव्हरआॅल, डान्स ट्रॉफी ओव्हरआॅल, थिएटर ट्रॉफी ओव्हरआॅल यामध्ये विशेष यश संपादन करण्यात विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. (प्रतिनिधी)