मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर

By रेश्मा शिवडेकर | Published: March 1, 2024 07:11 PM2024-03-01T19:11:34+5:302024-03-01T19:11:50+5:30

या परीक्षांना मार्चपासून सुरुवात होत आहेत. 

Mumbai University Summer Session 299 Exam Dates Announced | मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर

मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा मार्चपासून सुरुवात होत आहेत. 

यातील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ ची परीक्षा २२ मार्च तर तृतीय वर्ष  बीए व बीएस्सी सत्र ६ च्या परीक्षा ३ एप्रिल, बीए एमएमसी  सत्र ६ ची परीक्षा १६ एप्रिल व बीकॉम स्वयंअर्थसहाय्य अभ्यासक्रमाच्या सत्र ६च्या परीक्षा १५ एप्रिल रोजी सुरू होणार आहेत. विद्याशाखांचे ९० दिवसांचे सत्र, सुट्ट्या व इतर विविध व्यावसायिक परीक्षा याचाही विचार करून या तारखांचे वेळापत्रक तयार केले आहे
 
२९९ परीक्षेच्या तारखा जाहीर
विद्यापीठ दरवर्षी चार विद्याशाखेच्या ४५० पेक्षा जास्त परीक्षा घेत असते. विद्यापीठाने २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या एकूण ६९ परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ५७ परीक्षा, विज्ञान व  तंत्रज्ञान विद्याशाखेच्या  ७५ परीक्षा व आंतर विद्याशाखेच्या ९८ अशा एकूण २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. 
 
सत्र ६ चे वेळापत्रक जाहीर
पदवी परीक्षेच्या सत्र ६ च्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहे. इतर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात करण्यात येईल.
 
२ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी
उन्हाळी सत्राच्या परीक्षेमध्ये २ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यातील १ लाख ७६ हजार विद्यार्थ्यांना जानेवारी महिन्यातच आसन क्रमांक देण्यात आलेले आहेत. तसेच परीक्षेची प्रवेशपत्रे देखील तयार झाली असून लवकरच ती  महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये देण्यात येतील.
 
महत्वाच्या परीक्षांच्या तारखा
 
परीक्षा               तारीख 
 
१. बीकॉम सत्र ६ : २२ मार्च २०२४
२. बीए सत्र ६ : ३ एप्रिल २०२४
३. बीएस्सी सत्र ६ : ३ एप्रिल २०२४
४. बीएस्सी - कॉम्प्युटर सायन्स, आयटी 
    व बायोटेक. सत्र ६ : १९ एप्रिल २०२४
५. बीए एमएमसी सत्र ६ : १६ एप्रिल 
     २०२४
६. बीकॉम फिनांशियल मार्केटस,    
    बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, 
    बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स,
    बीकॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट,
    बीकॉम फिनांशियल मॅनेजमेंट,
    बीकॉम ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सत्र व 
    बीएमएस सत्र ६ : १५ एप्रिल २०२४ 
 
विद्याशाखानिहाय परीक्षा      संख्या 
 
मानव्य विद्याशाखा व विधी शाखा : ६९
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : ५७
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा : ७५
आंतर विद्याशाखा : ९८
 
उन्हाळी सत्राच्या परीक्षा नियोजित वेळेवर घेणे, वेळेत मुल्यांकन करून, निर्धारित वेळेत निकाल जाहिर करणे याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
- डॉ. पूजा रौंदळे, संचालिका, परीक्षा व मूल्यमापन मंडळ 

Web Title: Mumbai University Summer Session 299 Exam Dates Announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई