Mumbai University Bomb Scare: 'बीकॉमचा निकाल लवकर लावा, नाहीतर...', मुंबई विद्यापीठाला बॉम्बस्फोटाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 02:24 PM2021-08-15T14:24:52+5:302021-08-15T14:26:39+5:30

Mumbai University Bomb Scare: मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम अभ्यासक्रमाचा निकाल लवकर न लावल्यास विद्यापीठ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक विद्यार्थी असल्याचं अखेर निष्पन्न झालं आहे.

Mumbai University threat email of bomb blast hoax mailer turned out to be bcom student | Mumbai University Bomb Scare: 'बीकॉमचा निकाल लवकर लावा, नाहीतर...', मुंबई विद्यापीठाला बॉम्बस्फोटाची धमकी

Mumbai University Bomb Scare: 'बीकॉमचा निकाल लवकर लावा, नाहीतर...', मुंबई विद्यापीठाला बॉम्बस्फोटाची धमकी

googlenewsNext

Mumbai University Bomb Scare: मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम अभ्यासक्रमाचा निकाल लवकर न लावल्यास विद्यापीठ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक विद्यार्थी असल्याचं अखेर निष्पन्न झालं आहे. बीकॉमचा निकाल रखडल्यामुळे मानसिक तणावात असलेल्या विद्यार्थ्यानं शिवीगाळ करणारा एक ईमेल विद्यापीठाला पाठवला होता. यात कॅम्पस बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. सायबर पोलिसांनी या ईमेलचा माग काढल्यानंतर सदर ईमेल एका बीकॉमच्या विद्यार्थ्यानं केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला समज आणि नोटिस देऊन सोडलं आहे. 

बीकॉमच्या एका विद्यार्थ्यानं मुंबई विद्यापीठाच्या ईमेलवर कॅम्पस बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल सायबर केफेतून पाठवला होता. संबंधित मेल खोट्या माहितीच्या आधारे एका बनावट ईमेल आयडीवरून पाठविण्यात आल्याचं उघडकीस आलं. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेत ईमेल पाठवलेल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले. विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानंच ई-मेल पाठवल्याचं कबुल केलं. मात्र तो विद्यार्थी असून मानसिक तणावातून त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी नोटिस देऊन विद्यार्थ्याला सोडून दिलं आहे. 

Web Title: Mumbai University threat email of bomb blast hoax mailer turned out to be bcom student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.