मुंबई विद्यापीठाची तिहेरी बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:22 AM2018-02-08T02:22:17+5:302018-02-08T02:22:28+5:30

मुंबई विद्यापीठाने क्रीडा, कला-सांस्कृतिक आणि संशोधनाच्या क्षेत्रात तिहेरी बाजी मारली असून अव्वल स्थान कायम राखले आहे. १२व्या आंतरराज्य आविष्कार संशोधन महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळवला

Mumbai University trials | मुंबई विद्यापीठाची तिहेरी बाजी

मुंबई विद्यापीठाची तिहेरी बाजी

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाने क्रीडा, कला-सांस्कृतिक आणि संशोधनाच्या क्षेत्रात तिहेरी बाजी मारली असून अव्वल स्थान कायम राखले आहे. १२व्या आंतरराज्य आविष्कार संशोधन महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळवला, तर १५व्या आंतरराज्य इंद्रधनुष्य युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने कलात्मक सादरीकरण करून विजेतेपदाचा बहुमान पटकावला आहे.
या महोत्सवाच्या १५ वर्षांच्या इतिहासात एकूण १४ वेळा हा चषक राखण्याचा विक्रम मुंबई विद्यापीठाने केला आहे. त्याचबरोबर १९व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवातील ‘अश्वमेध’ स्पर्धेतही मुंबई विद्यापीठाने दैदीप्यमान कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे रंगलेल्या १२व्या आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाने ५ सुवर्ण आणि ४ रौप्यपदके पटकावून एकूण ३७ गुणांची कमाई केली आहे. यामध्ये मानव्यविद्या भाषा आणि ललित कला, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधि, सैधान्तिक विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषध आणि औषध निर्माण प्रवगार्तून सुवर्ण आणि रौप्यपदके पटकावली आहेत.
१५व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये मुंबई विद्यापीठाने बाजी मारली आहे. याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आयोजन करण्यात आले होते. गाणे, नृत्य आणि थिएटर या स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने ६३ गुणांची कमाई करत अव्वलस्थान पटकावले. थिएटर ट्रॉफी ओव्हरआॅल, म्युझिक ट्रॉफी ओव्हरआॅल, डान्स ट्रॉफी ओव्हरआॅलसह ‘गोल्डन गर्ल’ किताबावर मुंबई विद्यापीठाने मोहर उमटवली. लिटररी, थिएटर, डान्स, फाइन आर्ट आणि म्युझिक या वर्गवारीतील एकूण २० कलाप्रकारांवर मुंबई विद्यापीठाने पहिल्या तीन क्रमांकांत येत आपली छाप पाडली आहे.
डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली येथे आयोजित केलेल्या ‘क्रीडा महोत्सव अश्वमेध २०१७’मध्ये मुंबई विद्यापीठाने पुरुष आणि महिला गटांतील बास्केटबॉल, एथलॅटिक्स, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलिबॉल स्पर्धांमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावले आहेत.

Web Title: Mumbai University trials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.