मुंबई युनिव्हर्सिटीची मराठीला ढील, 'Nikita Kite'चं मराठीत 'निकिता पतंग'

By Admin | Published: February 28, 2017 08:33 AM2017-02-28T08:33:28+5:302017-02-28T08:35:26+5:30

मुंबई विद्यापीठाने ‘KITE NIKITA BABURAO SUREKHA’ हे नावाचं मराठीत भाषांतर करुन ‘पतंग निकिता बाबुराव सुरेखा’ असं छापूनच टाकलं

Mumbai University's disadvantage in Marathi, 'Nikita Kite' in Marathi, 'Nikita Kite' | मुंबई युनिव्हर्सिटीची मराठीला ढील, 'Nikita Kite'चं मराठीत 'निकिता पतंग'

मुंबई युनिव्हर्सिटीची मराठीला ढील, 'Nikita Kite'चं मराठीत 'निकिता पतंग'

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - विद्यापीठातून मिळणारं पदवी प्रमाणपत्र म्हणजे आपल्या करिअरमधील पुढच्या वाटचालीमध्ये उपयोगाला येणारा महत्वाचा कागद. एकाप्रकारे आपण घेतलेल्या शिक्षणाचा पुरावाच म्हणा ना...पण जर त्यात काही चुकीचं असेल तर मग तुम्ही चुकीच्या मार्गाने हे प्रमाणपत्र मिळवलं आहे असं वाटायला वेळ लागणार नाही. तुमच्या प्रमाणपत्रावर नावच चुकीचं असेल तर हे पटवून देण्यासाठी किती पाय-या झिजवाव्या लागतील याची कल्पनाच न केलेली बरी. मुंबई विद्यापीठाने तर ‘KITE NIKITA BABURAO SUREKHA’ हे नावाचं मराठीत भाषांतर करुन ‘पतंग निकिता बाबुराव सुरेखा’ असं छापूनच टाकलं. 
 
आजकाल प्रत्येकजण गुगल ट्रान्सलेटरचा वापर करत असतो. पण तो कुठे आणि कधी करावा याचंही भान ठेवावं लागतं. मुंबई विद्यापीठाने तर नावाचंही भाषांतर केलं आणि त्याचा निकाल म्हणजे ‘KITE NIKITA BABURAO SUREKHA’ चं झालं ‘पतंग निकिता बाबुराव सुरेखा’. 
 
निकिता किटे या विद्यार्थिनीने बॅचलर ऑफ मास मीडियाची परीक्षा दिली होती. या परीक्षेचं पदवी प्रमाणपत्र तिला प्रदान करण्यात आले. त्यावर शुद्धलेखनाच्या क्षुल्लक चुका आढळून आल्या आहेत. इंग्रजीत तिचं नाव योग्य लिहिण्यात आलं आहे, मात्र मराठीत लिहिताना नावाचं भाषांतर करुन पतंग लिहिण्यात आलं. पतंगला इंग्लिशमध्ये Kite म्हटलं जातं. पण हे इंग्रजीत नावंही असतं याची माहिती कदाचित मुंबई युनिव्हर्सिटीला नसावी. 
 
विशेष म्हणजे निकिताचीच मैत्रीण असलेल्या दिपालीच्या आडनाबाबतही अशीच चूक करण्यात आली आहे. ‘THAKURDESAI DEEPALI VASUDEV SWATI’ या नावाचं मराठीत भाषांतर करुन ‘ठाकुरभाई दिपाली वासुदेव स्वाती’ असं केलं आहे. ‘THAKURDESAI’ चं ‘ठाकुरभाई’ कसं होऊ शकतं, असा प्रश्न दिपालीला पडला आहे.
 
निकिताने कॉलेज प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. 160 व्या वर्धापन दिनी मुंबई युनिव्हर्सिटीने नव्या डिजाईन आणि लोगोसहित प्रमाणपत्र आणले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं नाव मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत असेल. ही प्रिटिंगदरम्यान झालेली चूक असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच प्रमाणपत्र बदलून देण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.
 

Web Title: Mumbai University's disadvantage in Marathi, 'Nikita Kite' in Marathi, 'Nikita Kite'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.