ट्विनिंग प्रोग्रामसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार, युरोपातील प्रतिष्ठित बोलोज्ञा विद्यापीठासोबत करार

By रेश्मा शिवडेकर | Published: December 29, 2023 02:57 PM2023-12-29T14:57:23+5:302023-12-29T14:58:35+5:30

Mumbai News: मुंबई विद्यापीठाने युरोपातील प्रतिष्ठित बोलोज्ञा विद्यापीठासोबत ट्विनींग प्रोग्रामसाठी करार केला आहे.

Mumbai University's initiative for twinning programme, tie-up with prestigious European University of Biology | ट्विनिंग प्रोग्रामसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार, युरोपातील प्रतिष्ठित बोलोज्ञा विद्यापीठासोबत करार

ट्विनिंग प्रोग्रामसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार, युरोपातील प्रतिष्ठित बोलोज्ञा विद्यापीठासोबत करार

- रेश्मा शिवडेकर 
मुंबई - मुंबई विद्यापीठाने युरोपातील प्रतिष्ठित बोलोज्ञा विद्यापीठासोबत ट्विनींग प्रोग्रामसाठी करार केला आहे. या दोन्ही विद्यापीठात झालेल्या करारानुसार इरॅस्मस प्लस इंटरनॅशनल क्रेडिट मोबिलिटी (आयसीएम) अंतर्गत मानव्यविद्याशाखेमध्ये शिकणाऱ्या आणि इटालियन आणि फ्रेंच भाषेत पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांना बोलोज्ञा विद्यापीठात तिसऱ्या सत्राचे शिक्षण घेता येईल. तसेच बोलोज्ञा विद्यापीठातील विद्यार्थ्यांस मुंबई विद्यापीठात तिसऱ्या सत्रासाठी प्रविष्ठ होता येईल. ट्विनिंग प्रोग्रामनुसार चार सत्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या एका सत्राचे क्रेडिट हस्तांतरण दोन्ही उभयातांमध्ये करता येईल.

या देवाणघेवाण प्रक्रियेमुळे विविध देशांतील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक आणि संशोधन पद्धतींच्या सामायिकरणास प्रोत्साहन मिळेल, असा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

फोर्ट संकुलात झालेल्या या कार्यक्रमासाठी प्र.कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. कविता लघाटे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी सहाय्य केंद्राचे समन्वयक डॉ. सुनील पाटील यांच्यासह बोलोज्ञा विद्यापीठातून प्रा. ब्रुना कोंकोनी आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संचालिका प्रा. राफाएल्ला काम्पानेर उपस्थित होते. 

८ विद्यापीठाचा संघ
मुंबई विद्यापीठ हे ८ विद्यापीठ मिळून तयार झालेल्या संघाचा पूर्णवेळ भागीदार आहे. यात बोलोज्ञा, स्ट्रासबर्ग, म्युलस, थेस्सलोनिकी, लिसबन, सेनेगाल आणि तीब्लीसी यांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर युरोपियन स्टडीजच्या अंतर्गत पूर्णवेळ एम.ए. (युरोपियन साहित्य आणि संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय बहुपर्यायी पदव्युत्तर अभ्यासक्रमः मास्टर सीएलई) राबवला जातो. त्याचबरोबर स्पॅनिश भाषा आणि संस्कृती, इटालियन भाषा आणि संस्कृती आणि पाश्चिमात्य कला आणि रसग्रहण यामध्ये प्रमाणपत्र आणि पदविका अर्धवेळ अभ्यासक्रम राबविले जात असल्याचे सेंटर फॉर युरोपियन स्टडीजच्या संचालिका प्रा. विद्या वेंकटेशन यांनी सांगितले.
....

Web Title: Mumbai University's initiative for twinning programme, tie-up with prestigious European University of Biology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.