Join us

मुंबई विद्यापीठात आता ‘मुंबई स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’, आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षे २५ कोटी रुपये निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 4:26 AM

देशातील आद्य अर्थशास्त्र विभाग असलेल्या मुंबई स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स विभागाला जागतिक संस्थेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी त्याचे नामकरण

मुंबई : देशातील आद्य अर्थशास्त्र विभाग असलेल्या मुंबई स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स विभागाला जागतिक संस्थेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी त्याचे नामकरण मुंबई अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण संस्था (मुंबई स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी) असे करण्यासह चालू आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षे २५ कोटी रुपये निधी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था ही उपयोजित अर्थशास्त्र, सार्वजनिक धोरण, संख्यात्मक गणिती वित्तीय अर्थशास्त्र व डेटा सायन्स या विषयासंबंधी जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणून कार्य करेल. तसेच या विषयांशी संबंधित पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थेमार्फत चालवले जातील. या अभ्यासक्रमांमुळे महाराष्ट्रातील आणि देशातील विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विषयातील दर्जेदार शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील शिक्षक आणि संशोधकांनी अखिल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने विभागाला प्रगत अध्ययन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. स्वायत्त दर्जा प्राप्त असलेल्या या विभागाचा अभ्यासक्रम आजमितीस अर्थशास्त्र विषयातील जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांमध्ये गणला जातो.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ