मुंबई विद्यापीठाचा नवा गोंधळ : केवळ सातच दिवसांआधी आयडॉलने जाहीर केली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:41 AM2018-05-10T05:41:34+5:302018-05-10T05:41:34+5:30

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागू नये, म्हणून विद्यार्थी काम करता-करता शिकतात. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचा (दूरस्थ शिक्षण संस्था) पर्याय निवडतात. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांतील गोंधळ वाढता वाढे असाच असल्याने, आता आयडॉलच्या विद्यार्थ्यांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Mumbai University's new mess: Only seven days before the announcement of the test announced by Idol | मुंबई विद्यापीठाचा नवा गोंधळ : केवळ सातच दिवसांआधी आयडॉलने जाहीर केली परीक्षा

मुंबई विद्यापीठाचा नवा गोंधळ : केवळ सातच दिवसांआधी आयडॉलने जाहीर केली परीक्षा

Next

मुंबई : आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागू नये, म्हणून विद्यार्थी काम करता-करता शिकतात. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचा (दूरस्थ शिक्षण संस्था) पर्याय निवडतात. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांतील गोंधळ वाढता वाढे असाच असल्याने, आता आयडॉलच्या विद्यार्थ्यांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण आयडॉलच्या टीवायबीएससी (आयटी)च्या विद्यार्थ्यांना फक्त सात दिवसआधी वेळापत्रक मिळाल्यामुळे अभ्यास करायचा कसा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे.
टीवायबीएससी (आयटी)ची परीक्षा १४ मे २०१८ पासून सुरू होत असून, याचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. मात्र, त्यावरील तारीख पाहता, ते १० एप्रिल रोजीच तयार असताना इतक्या उशिरा का जाहीर करण्यात आले, असा सवाल आयडॉलच्या टीवायबीएससी (आयटी)च्या विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
आयडॉलला प्रवेश घेणारे विद्यार्थी हे कोणत्या ना कोणत्या संस्थेत काम करत असतात. त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी लगेच सुट्टी मिळणे शक्य नसते. सोबतच ७ दिवसांपूर्वी वेळापत्रक जाहीर झाल्यास, आम्ही परीक्षेची तयारी करायची कशी, असा प्रश्न विद्यार्थी करत आहेत. परीक्षा सुरू होण्याआधी महिनाभर आधी त्याचे वेळापत्रक जाहीर होणे अशी पद्धती असल्याने विद्यापीठाकडून असा बेजबाबदारपणा का, असा सवाल विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांना केलेल्या मेलमध्ये केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल विभागाने परीक्षा पुढे ढकलली नाही, तर आमचे मोठे नुकसान होणार आहे. कारण आम्ही नोकरी करून शिकतो. आम्हाला परीक्षेसाठी कामावरून एवढ्या कमी कालावधीत सुट्टी मिळेल की नाही, हा प्रश्न आहेच. शिवाय अभ्यास करायलाही पुरेसा वेळ नाही.
- अवनीश कुमार झा, टीवायबीएससी (आयटी) , आयडॉल

Web Title: Mumbai University's new mess: Only seven days before the announcement of the test announced by Idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.