युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाची बाजी

By admin | Published: February 18, 2015 12:49 AM2015-02-18T00:49:34+5:302015-02-18T00:49:34+5:30

असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ३0 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने निर्विवाद वर्चस्व राखत महोत्सवावर विजयी पताका फडकवली आहे.

Mumbai University's Youth Festival | युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाची बाजी

युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाची बाजी

Next

मुंबई : असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ३0 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने निर्विवाद वर्चस्व राखत महोत्सवावर विजयी पताका फडकवली आहे. गेल्या सात वर्षांत सलग सहा वेळा मुंबई विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावत राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये १३ वेळा निर्विवाद वर्चस्व राखण्याचा बहुमानही विद्यापीठाला मिळाला आहे.
मध्य प्रदेशातील देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर येथे १२ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत युवा महोत्सव पार पडला. या महोत्सवामध्ये पाच विभागीय क्षेत्रांमधून ७४ विद्यापीठांनी भाग घेतला होता. ७४ विद्यापीठांमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात मुंबई विद्यापीठाने गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू विद्यापीठ, जम्मू विद्यापीठ आणि देवी अहिल्या विद्यापीठाला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. मुंबई विद्यापीठाने ८३ गुणांची कमाई करीत गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसरला ५0 गुणांनी मागे टाकत बाजी मारली आहे.
लिटरेचर, फाइन आटर््स, थिएटर, म्युझिक आणि डान्स या पाच विभागांतील स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत आणि ८३ गुणांची कमाई करीत परत एकदा युवा महोत्सवाचा चषक मुंबई विद्यापीठाच्या टीमने आपल्याकडेच राखला आहे. महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर येथे १९ ते २२ नोव्हेंबर २०१४ ला आयोजित करण्यात आलेल्या वेस्ट झोन युवा महोत्सवामध्ये १३ विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याने मुंबई विद्यापीठाचा राष्ट्रीय युवा महोत्सवात समावेश झाला होता.
मुंबई विद्यापीठातर्फे मिठीबाई महाविद्यालय, रुईया महाविद्यालय, एसआयईसी महाविद्यालय, डीबीजे महाविद्यालय, जोशी बेडेकर महाविद्यालय, विवा महाविद्यालय, पोतदार महाविद्यालय, एसकेपी मालवण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, राजीव गांधी नाइट महाविद्यालय, डहाणूकर महाविद्यालय, गोगटे महाविद्यालय, रत्नागिरी महाविद्यालय, लॉडर््स महाविद्यालय, गोन्सालिया महाविद्यालय, जेजे स्कूल आॅफ फाइन आर्ट्स, के.जे. सोमय्या महाविद्यालय इत्यादी महाविद्यालयांनी या युवा महोत्सवामध्ये भाग घेऊन स्पर्धांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले.
मुंबई विद्यापीठाने केलेल्या या देदीप्यमान कामगिरीमुळे आज राष्ट्रीय स्तरावर मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक होतो आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या सहकार्याने आम्हाला ही विजयी पताका फडकावता आली आहे. आमच्यासाठी ही मोठी संधी आहे़ वन अ‍ॅक्ट प्ले, वेस्टर्न ग्रुप साँग आणि क्लासिकल डान्समध्ये सुवर्णपदक पटकावले असते, तर मुंबई विद्यापीठाला ९५ गुण मिळाले असते, असे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मृदूल निळे यांनी सांगितले.

स्पर्धांचे निकाल :
फोल्क आॅर्केस्ट्रा - नॅशनल गोल्ड
इंडियन क्लासिकल व्होकल - नॅशनल गोल्ड
क्वीझ - नॅशनल गोल्ड
पोस्टर मेकिंग - नॅशनल गोल्ड
मिआमी - नॅशनल गोल्ड
रंगोली - सिल्व्हर
क्लासिकल डान्स - सिल्व्हर
नॉन पर्क्युशन - सिल्व्हर
इंडियन ग्रुप साँग - सिल्व्हर
वेस्टर्न ग्रुप साँग - सिल्व्हर
क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल - सिल्व्हर

Web Title: Mumbai University's Youth Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.