Mumbai Unlock: मुंबईत अनलॉकशी निगडीत नियमावली जारी; पाहा काय सुरू, काय बंद?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 01:59 PM2021-06-06T13:59:44+5:302021-06-06T14:04:14+5:30

Break The Chain Mumbai : मुंबई महानगरपालिकेनं जारी केली नियमावली. उद्यापासून मुंबई सुरू होणारं सर्व दुकानं, तुर्तास लोकलप्रवास नाहीच.

Mumbai Unlock Rules related to Mumbai Unlock issued coronavirus break the chain bmc | Mumbai Unlock: मुंबईत अनलॉकशी निगडीत नियमावली जारी; पाहा काय सुरू, काय बंद?

Mumbai Unlock: मुंबईत अनलॉकशी निगडीत नियमावली जारी; पाहा काय सुरू, काय बंद?

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई महानगरपालिकेनं जारी केली नियमावली. उद्यापासून मुंबई सुरू होणारं सर्व दुकानं, तुर्तास लोकलप्रवास नाहीच.

महाराष्ट्रात सोमवारपासून ५ टप्पांत अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबईला यामध्ये तिसऱ्या टप्प्यात सामील करण्यात आलं आहे. शनिवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिका स्वतंत्र नियमावली जारी करणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, सोमवारी ७ जूनपासून मुंबईत सर्व दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

राज्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे तर १८ जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने सोमवारपासून पाचस्तरीय अनलॉक करण्याची घोषणा केली आहे. यानंतर मुंबई महानगरपालिकेनं आपली स्वतंत्र नियमावली जारी केली आहे.



काय सुरू, काय बंद?

  • अत्यावश्यक सेवांची दुकानं आणि आस्थापना दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. 
     
  • औषधांच्या दुकांनाना २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी.
     
  • अन्य दुकारे आणि आस्थापना सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
     
  • मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे राहणार बंद.
     
  • उपहारगृहांना सोमवार ते शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी. त्यानंतर केवळ टेक अवे सुविधा.
     
  • लोकल सेवा वैद्यतीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू राहणार.
     
  • सार्वजनिक ठिकाणे (खुली मैदानं, वॉकिंग, सायकलिंग) पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहणार.
     
  • खासगी कार्यालयांना कामकाजाच्या दिवशी ४ वाजेपर्यंत कामकाज सुरू ठेवण्याची परवानगी. ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच बोलावता येणार.
     
  • क्रीडा : पहाटे ५ ते सकाळी ९ आणि संध्याकाळी ६ ते ९ (केवळ बाह्य खेळ)
     
  • संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच बाहेर चित्रिकरण करण्यास परवानगी. त्यानंतर बाहेर जाण्यास परवागी नाही.
     
  • सामाजित आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्क्यांपर्यंत परवानगी.
     
  • लग्नसोहळ्यास ५० जणांना तर अंत्यसंस्काराला २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी.
     
  • स्थानिक, सहकारी संस्थांच्या सभा निवडणुकांना ५०  टक्के क्षमतेसह परवानगी.
     
  • बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना परवानगी. इतर कामगारांना दुपारी ४ पर्यंत काम करण्याची परवानगी.
     
  • दररोज दुपारी ४ वाजेपर्यंत कृषीसंबंधी कामकाजाला परवानगी.
     
  • ई-कॉमर्सला परवानगी.
     
  • सायंकाळी ५ वेजेपर्यंत जमावबंदी आणि संध्याकाळी ५ नंतर संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.
     
  • बेस्ट सेवा १०० टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी. उभं राहून प्रवास करता येणार नाही.
     
  • कार्गो सेवा सुरू करण्यास परवानगी.
     
  • आंतरजिल्हा वाहतुकीला (खासगी, कार, टॅक्सी,बस) पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यातून वाहन जाणार नसल्यास प्रवास करण्याची परवानगी.
     

Web Title: Mumbai Unlock Rules related to Mumbai Unlock issued coronavirus break the chain bmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.