Mumbai unlock : मुंबई आजपासून अनलॉक; पण पुढे धोका आहे...; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 10:03 AM2021-06-07T10:03:52+5:302021-06-07T10:04:28+5:30

Mumbai unlock : गेल्या दीडेक वर्षापासून मुंबईकर कोरोनाशी दोन हात करत आहेत. लॉकडाऊन, कठोर निर्बंध आणि आता पुन्हा अनलॉकच्या प्रवासात मुंबईकरांनी कोरोनावर एकहाती विजय मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

Mumbai unlocked from today; But there is danger ahead; Municipal Corporation appeals to the citizens | Mumbai unlock : मुंबई आजपासून अनलॉक; पण पुढे धोका आहे...; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

Mumbai unlock : मुंबई आजपासून अनलॉक; पण पुढे धोका आहे...; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

Next

मुंबई : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार, मुंबई पालिकेच्या हद्दीत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट ५.५६ टक्के असून, ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर ३२.५१ टक्के आहे. त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने कोरोनाचे कठोर निर्बंध किंचित सैल केले आहेत. मात्र, तरीही कोरोनाचे समूळ उच्चाटन होईपर्यंत मुंबईकरांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे कठोर पालन या निमित्ताने करावे, असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. तर दुसरीकडे लोकलमधून प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अद्यापही ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे लोकल ट्रॅकवर धावणाऱ्या मुंबापुरीचा वेग नेहमीच्या तुलनेत शिथिलच असणार आहे.

गेल्या दीडेक वर्षापासून मुंबईकर कोरोनाशी दोन हात करत आहेत. लॉकडाऊन, कठोर निर्बंध आणि आता पुन्हा अनलॉकच्या प्रवासात मुंबईकरांनी कोरोनावर एकहाती विजय मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गणेशोत्सव आणि दिवाळीदरम्यान वाढलेल्या कोरोनाच्या आलेखाने धडकी भरलेल्या मुंबईकरांनी आजपासून लागू होत असलेल्या अनलॉकदरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. विशेषत: कारण नसताना घराबाहेर पडू नये. बाजारात उगाच गर्दी करू नये. मास्क परिधान करावा, अशा अनेक नियमांचे पालन मुंबईकरांनी आजपासूनच्या अनलॉकदरम्यान करावे, असे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केले आहे.

काय सुरू
- सर्व दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने आणि दुकाने शनिवारी, रविवारी बंद राहतील.
- ४ वाजेपर्यंत रेस्टॉरंट बसून जेवण करण्याकरिता ५० टक्के खुले राहतील. ४ नंतर पार्सल.
- सार्वजनिक जागा, खुली मैदाने, वॉक, सायकलिंग रोज सकाळी ५ ते ९ खुले राहील.
- खासगी कार्यालये अत्यावश्यक सेवा वगळता ४ वाजेपर्यंत खुली राहतील.
- खेळासाठी सकाळी ५ ते ९ तर संध्याकाळी ६ ते रात्री ९ ही वेळ आहे.
- लग्न सोहळे ५० टक्के उपस्थितीची परवानगी
- अंत्यविधीला २० लोकांना उपस्थितीची परवानगी
- जीम, सलून, ब्युटी सेंटर, स्पॉ, वेलनेस सेंटरला ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत परवानगी, एसी वापरू नये.

काय बंद
सर्वसामान्यांसाठी लोकल बंदच
जमाव बंदी सायंकाळी ५, तर संचार बंदी सायंकाळी ५ नंतर
सायंकाळी ५ इन डोअर शूटिंग करण्यास परवानगी
मॉल, थियटर, नाट्यगृह

फक्त बसून प्रवास
‘ब्रेक द चेन’अंतर्गत बेस्ट उपक्रमाला ७ जूनपासून बसगाड्यांमधील पूर्ण आसनक्षमतेनुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. (फक्त बसून प्रवास) प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाकडून अधिकाधिक बसगाड्या चालविल्या जाणार आहेत. तरी मुंबईकर प्रवासी जनतेने याची नोंद घ्यावी. बसमधून प्रवास करतेवेळी तोंडावर मास्क अवश्य लावावा, अशी विनंती बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आली आहे.

कोणाकडे आहे कोणती जबाबदारी?
आयुक्त इकबाल सिंह चहल - जम्बो कोविड रुग्णालयांचे नियोजन व व्यवस्थापन यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे.

अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे - रुग्णालयांच्या अनुषंगाने आकडेवारीचे संगणकीय, ऑनलाइन संकलन, विश्लेषण यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल - जम्बो कोविड रुग्णालय उभारण्याची व कार्यान्वित करण्याची कार्यवाही यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू - रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवठा सुरळीत राहण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी - रुग्णालयांचे दैनंदिन नियोजन व व्यवस्थापन हे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे

 

Web Title: Mumbai unlocked from today; But there is danger ahead; Municipal Corporation appeals to the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.