प्रश्न मार्गी लागेपर्यंत मुंबईतच ठाण
By admin | Published: May 30, 2017 05:38 AM2017-05-30T05:38:39+5:302017-05-30T05:38:39+5:30
मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबईत सकल मराठा क्रांती महामोर्चा ३० मे रोजीच होणार असल्याची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबईत सकल मराठा क्रांती महामोर्चा ३० मे रोजीच होणार असल्याची माहिती महामोर्चाच्या आयोजकांपैकी एक असलेले प्रा. संभाजी पाटील यांनी दिली. त्याचप्रमाणे या महामोर्चानंतर बेमुदत उपोषण करण्यात येणार असून प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा समाज मुंबई सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री किसनराव वरखिंडे यांनी तयार केलेल्या मसुद्याप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची घोषणा करावी. स्वामिनाथन आयोग लागू करावा. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. कोपर्डी हत्याकांडामधील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आदी मागण्यांसाठी मोर्चा तसेच उपोषण, आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या वेळी भारतीय मराठा महासंघ बदलापूर शहराच्या वतीने शहराध्यक्ष अविनाश देशमुख यांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला तसेच बदलापूरमधील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बलराम भडेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पाटील, कोषाध्यक्ष अमोल चव्हाण, अंबरनाथ तालुकाध्यक्ष सदानंद भोईर, महिला शहराध्यक्षा अनिता पाटील, उपाध्यक्ष अनिता जाधव आदी उपस्थित होते.
आरक्षणाची मागणी होणार
भारतीय मराठा महासंघाच्या बदलापूर शहर कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रा. पाटील यांनी सकल मराठा क्र ांती महामोर्चाच्या आयोजनाची माहिती दिली. या वेळी सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा.