उष्णतेच्या लाटेमुळे मुंबई, विदर्भासह राजस्थानचीही काहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 05:42 AM2018-05-01T05:42:02+5:302018-05-01T05:42:02+5:30

मे महिना सुरू होत असतानाच, उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट असून, महाराष्ट्र आणि राजस्थानातील शहरांचे कमाल तापमान ४० अंशापार गेले आहे.

Mumbai, Vidarbha and Rajasthan too, due to the heat wave | उष्णतेच्या लाटेमुळे मुंबई, विदर्भासह राजस्थानचीही काहिली

उष्णतेच्या लाटेमुळे मुंबई, विदर्भासह राजस्थानचीही काहिली

Next

मुंबई : मे महिना सुरू होत असतानाच, उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट असून, महाराष्ट्र आणि राजस्थानातील शहरांचे कमाल तापमान ४० अंशापार गेले आहे. सोमवारी राजस्थानमधील बुंदी शहराचे कमाल तापमान ४६.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, हे देशातील सर्वाधिक तापमान आहे. दुसरीकडे मुंबईकरांनाही उन्हासह उकाड्याने घाम फोडला असून, दुपारी १ ते ३ वाजेदरम्यानच्या वातावरणाने मुंबईकरांची काहिली होत आहे.
स्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि विदर्भात उष्णतेची लाट असून, मंगळवारसह बुधवारीही येथे उष्णतेची लाट कायम राहील. देशात राजस्थान आणि महाराष्ट्रातील विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. दुसरीकडे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यात पावसाची नोंद झाली आहे. सिक्कीम, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यात पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र
आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली
आहे.
मराठवाड्यासह विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. १ ते ३ मे दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

उकाडा वाढतच जाणार
मंगळवारसह बुधवारी मुंबईमधील आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर असले, तरी प्रत्यक्षात मात्र येथे वाहणारे कोरडे, उष्ण वारे मुंबईकरांच्या घशाला कोरड पाडत असून, उकाड्याने मुंबईकर घामाघूम झाले होत आहेत. या उकाड्यात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राजस्थान आणि विदर्भात उष्णतेची लाट असून, मंगळवारसह बुधवारीही उष्णतेची लाट कायम राहील.
देशात राजस्थान आणि महाराष्ट्रातील विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यात पावसाची नोंद झाली आहे. सिक्कीम, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यात पावसाची शक्यता आहे.

Web Title: Mumbai, Vidarbha and Rajasthan too, due to the heat wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.