Join us

मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या; महापालिकेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 7:11 AM

घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाच्या पाण्याची टाकी क्रमांक २च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. हा जलाशय ७ मेपासून कार्यान्वित करण्यात आल्याने, ७ मेपासून पुढील सात दिवस म्हणजे, १४ मेपर्यंत मुंबईकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मुंबई : घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाच्या पाण्याची टाकी क्रमांक २च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. हा जलाशय ७ मेपासून कार्यान्वित करण्यात आल्याने, ७ मेपासून पुढील सात दिवस म्हणजे, १४ मेपर्यंत मुंबईकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.संघर्षनगर, खैराणी रोड दोन्ही साइड, सरदार कम्पाउंड डिसुझा कम्पाउंड, अयप्पा मंदिर मार्ग, लक्ष्मी नारायण मंदिर मार्ग, यादवनगर, राजीवनगर, अहमद रजा मार्ग, भानुशालीवाडी, कुलकर्णीवाडी, लोयल्का कम्पाउंड, सुभाषनगर, बारदान गल्ली, इंदिरानगर, मोहिली पाइप लाइन, परेरावाडी, गणेशनगर, नारायणनगर, नारीसेवा सदन मार्ग, भीमनगर, आंबेडकरनगर/ सानेगुरुजीनगर, सुंदरबाग, वाल्मिकीनगर, अशोकनगर, हिमालया सोसायटी, संजयनगर, समतानगर, गैबंशा स्कूल, नुराणी मशीद, गरिबी हटावनगर, मुकुंद कम्पाउंड येथे गढूळ पाणीपुरवठा होणार आहे.आनंदगड, शंकर मंदिर, रामनगर, हनुमान मंदिर, राहुलनगर, कैलासनगर, संजय गांधीनगर, वर्षानगर, जय मल्हारनगर, खंडोबा टेकडी, शिवाजीनगर, आंबेडकरनगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टँक, डी आणि सी मनपा वसाहत, रायगड विभाजी, गावदेवी, पठाण चाल, अमृतनगर, इंदिरानगर २, अमिनाबाई चाल, काठोडी पाडा, भीमनगर, इंदिरानगर १, अल्ताफनगर, गेलदानगर, जब्लुशानगर, गोलीबार रोड, सेवानगर, ओएनजीसी कॉलनी, माझगाव डाक कॉलनी, गंगावाडी गेटनगर २ विक्रोळी पार्क साइटचा अंशत: भाग, सिद्धार्थनगर, साईनाथनगर आणि रोहिदास रोड या भागांत गढूळ पाणीपुरवठा होणार आहे.

टॅग्स :मुंबईपाणी