मुंबईतील पाणी कपात लवकरच होणार रद्द?, तलाव ७९ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 02:24 AM2020-08-18T02:24:30+5:302020-08-18T02:24:37+5:30

सात तलावांमध्ये आता ७९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे ५ आॅगस्टपासून मुंबईत सुरू असलेली २१ टक्के पाणीकपात लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे.

Mumbai water cut to be canceled soon? | मुंबईतील पाणी कपात लवकरच होणार रद्द?, तलाव ७९ टक्के भरले

मुंबईतील पाणी कपात लवकरच होणार रद्द?, तलाव ७९ टक्के भरले

Next

मुंबई : गेल्या महिन्यात तलावांमध्ये ३४ टक्के जलसाठा उरल्याने मुंबईवर पाणी संकट ओढावले होते. मात्र १५ दिवसांत मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रात हजेरी लावून चित्र पालटले आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आता ७९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे ५ आॅगस्टपासून मुंबईत सुरू असलेली २१ टक्के पाणीकपात लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे.
वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात जवळपास सर्व तलाव भरून वाहू लागले होते. मात्र यंदा आतापर्यंत तुळशी आणि विहार हे सर्वात लहान तलाव भरून वाहू लागले आहेत. तर मोडक सागर, तानसा, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा ८० ते ९० टक्के भरले आहेत. सध्या तलाव क्षेत्रात ११ लाख ४४ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे.
>जलसाठ्याची आकडेवारी(मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १२१४२२ १६२.२१
तानसा १२८.६३ ११८.८७ ११९१९५ १२७.२५
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.३०
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.२४
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ १४५८७० ६००.९५
भातसा १४२.०७ १०४.९० ५५४६१३ १३५.८४
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १६७८२९ २८०.६५
>१७ आॅगस्ट
रोजी तलावांमध्ये जलसाठा
वर्ष जलसाठा टक्के
२०२० ११४४६७२ ७९.०९
२०१९ १३६७०६१ ९४.९५
२०१८ १३११७०८ ९०.६३

Web Title: Mumbai water cut to be canceled soon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.