Mumbai: आजपासून पुढचे २४ तास पाणीपुरवठा खंडित, पाणी जपून वापरण्‍याचे महानगरपालिकेचे आवाहन

By सीमा महांगडे | Published: August 22, 2023 06:02 PM2023-08-22T18:02:11+5:302023-08-22T18:02:30+5:30

Mumbai: ‘कप्पा क्रमांक १’ मध्ये इनलेटद्वारे (१८०० मिमी) पाणी भरणा करण्याचे काम आजपासून पुढील २४ तासांत हाती घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काही तांत्रिक बाबींच्या गरजेनुसार ‘एम पूर्व’ व ‘एम पश्चिम’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Mumbai: Water supply cut for the next 24 hours from today, municipal corporation appeals to use water sparingly | Mumbai: आजपासून पुढचे २४ तास पाणीपुरवठा खंडित, पाणी जपून वापरण्‍याचे महानगरपालिकेचे आवाहन

Mumbai: आजपासून पुढचे २४ तास पाणीपुरवठा खंडित, पाणी जपून वापरण्‍याचे महानगरपालिकेचे आवाहन

googlenewsNext

- सीमा महांगडे

मुंबई -  मुंबई महानगरपालिकेच्या ट्रॉम्बे उच्च स्तरीय जलाशयातील कप्पा क्रमांक १ व २ ची दुरुस्ती कामे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून हाती घेण्यात आली होती ती आता पूर्ण झाली आहेत. दरम्यान यानंतर आता ‘कप्पा क्रमांक १’ मध्ये इनलेटद्वारे (१८०० मिमी) पाणी भरणा करण्याचे काम आजपासून पुढील २४ तासांत हाती घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काही तांत्रिक बाबींच्या गरजेनुसार ‘एम पूर्व’ व ‘एम पश्चिम’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद असण्याचा अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असण्याच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती पालिकेकडून करण्यात आली आहे. 

Web Title: Mumbai: Water supply cut for the next 24 hours from today, municipal corporation appeals to use water sparingly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.