Join us

मुंबई गेली पुन्हा खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:58 AM

सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या विक्रमी पावसामुळे मुंबईचे रस्ते पुन्हा एकदा खड्ड्यात गेले आहेत.

मुंबई : सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या विक्रमी पावसामुळे मुंबईचे रस्ते पुन्हा एकदा खड्ड्यात गेले आहेत. जेमतेम दोनशे खड्डे शिल्लक असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे खड्ड्यात भरलेले मिश्रणही वाहून जात असल्याने परिस्थिती जैसे थेच आहे.रेडिओ जॉकी मलिष्का हिने मुंबईतील खड्ड्यांवर विडंबन गीत काढून पालिकेच्या कारभाराचे पुन्हा एकदा वाभाडे काढले आहेत. मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन महापालिकेने पाच वर्षांपूर्वी दिले होते. मात्र या वर्षी सतत बरसणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईच्या रस्त्यांची चाळण केली आहे. पाऊस थांबत नसल्याने पालिकेला खड्डे भरणेही अवघड झाले आहे.या वर्षी जून महिन्यापासून महापालिकेकडे आतापर्यंत खड्ड्यांच्या ३६४९ तक्रारी आल्या आहेत. यापैकी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे ३४१६ खड्डे भरण्यात आल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसात खड्ड्यांमधील मिश्रणही वाहून गेले. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांमधून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे.>फोर्ट, कुलाबा, कफ परेड, पायधुणी, काळबादेवी, वांद्रे, वरळी, अंधेरी पूर्व, मरोळ, साकी नाका, मुलुंड अशा काही ठिकाणी खड्ड्यांच्या तक्रारी होत्या.टउॠट 247 हे अ‍ॅप आणि ट्विटर हँडल @े८ुेू याद्वारे नागरिकांकडून खड्ड्यांच्या तक्रारी घेण्यात येत आहेत.महापालिकेबरोबरच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगरप्रादेशिक विकास प्राधिकरण, आरे, सार्वजनिक बांधकाम खाते, मुंबई पोर्ट ट्रस्ट, म्हाडा, एसआरए अशा अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारीतील १२९ किमी रस्तेही मुंबईत आहेत.गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने ११६ कोटी रुपये खर्च केल्याचे माहितीच्या अधिकाराखाली उजेडात आले आहे.२०१४ ते २०१९ या कालावधीत मुंबईतील खड्ड्यांची संख्या २००९ ते २०१४ च्या तुलनेत दीडशे टक्क्यांनी वाढली आहे.खड्ड्यांची संख्या...जून २००९ ते जून २०१४ -७७७५सन २०१४ ते २०१९ -१९५९७एक खड्डा भरण्यासाठी सरासरी १७ हजार रुपये खर्च करण्यात आले असल्याचेही समोर आले आहे.>मुंबईतील रस्ते मुसळधार पावसामुळे खड्ड्यात गेले आहेत. गणरायांनाही या खड्ड्यांतूनच जावे लागले. पण पालिका प्रशासनाला काही जाग आलेली नाही. वाहनचालकांना गाडी चालविणेही अवघड झाले आहे. एखादा अपघात झाल्यास पालिका प्रशासन त्याची जबाबदार स्वीकारणार का?- राखी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (गटनेते)