पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं, वांद्रे स्थानकात तांत्रिक बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 09:25 AM2018-10-27T09:25:00+5:302018-10-27T09:52:03+5:30
पश्चिम रेल्वेवरील वाहतूक उशिरानं सुरू आहे. 10 ते 15 मिनिटं उशिरानं लोकल धावत आहेत.
मुंबई - पश्चिम रेल्वेवरील वाहतूक उशिरानं सुरू आहे. 10 ते 15 मिनिटं उशिरानं लोकल धावत आहेत. वांद्रे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. पण वाहतूक सेवेवरील परिणाम कायम आहे. सकाळच्या वेळेसच पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं प्रवासी हैराण झाले आहेत.
Due to a technical problem at Bandra, All local trains are running 10 to 15min behind schedule. @WesternRly#WRUpdates
— DRM WR MumbaiCentral (@drmbct) October 27, 2018
(हार्बर मार्गावर ब्लॉकमुक्त रविवार, मध्य, ट्रान्स हार्बरवर ब्लॉक)
मुंबई : वांद्रे स्थानकात तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने. @WesternRly#WRUpdates
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) October 27, 2018
पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक
पश्चिम रेल्वेने शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे. मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११ वाजून १५ मिनिटे ते ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. या काळात लोकल फेऱ्या परळ-दिवा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविल्या जातील. यामुळे लोकल फे-या २० मिनिटे विलंबाने धावतील.
दरम्यान, हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने ब्लॉकमुक्त रविवारची घोषणा करून सुखद धक्का दिला आहे. ब्लॉकमुक्त रविवार असल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तर, मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी/नेरूळ मार्गावर रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील जलद लोकलला नेहमीच्या थांब्यांसह अतिरिक्त थांबा देण्यात येईल.
ट्रान्स हार्बरवर ठाणे-वाशी/ नेरूळ अप -डाऊन मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत ब्लॉक आहे. या काळात लोकल बंद असून विशेष लोकल चालविण्यात येतील. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक नाही; मात्र वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी ते रविवारी रात्री २ वाजून ५० मिनिटांपर्यंत ३ तासांचा ब्लॉक आहे. डाऊन जलद मार्गावर रविवारी रात्री १ वाजून २५ मिनिटे ते पहाटे ४ वाजून २५ मिनिटांपर्यंत कामे करण्यात येतील.
>दिव्यातून धावणार दादर-रत्नागिरी
ब्लॉकमुळे ट्रेन क्रमांक ५०१०४ रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. यामुळे (५०१०३) दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातून रवाना होणार आहे. पॅसेंजरच्या प्रवाशांसाठी दादर स्थानकातून विशेष लोकल चालवली जाईल.